शेतकरी राजा ग्रुपची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी!
पातूर (Farmers Loan Waiver) : राज्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले मोठे नुकसान आणि शेतकऱ्यांची (Farmers) बिकट आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने तातडीने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी राजा ग्रुपने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शेतकरी राजा ग्रुपच्या लढायला यश!
मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) कापूस, तूर, सोयाबीन, ज्वारी, ऊस यांसारखी खरीप पिके भुईसपाट झाली आहेत. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचून पिके पूर्णपणे सडून गेली आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक गेले असून शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत. पिकांच्या नुकसानीसोबतच जनावरांचेही मोठे नुकसान झाले आहे, तर काही ठिकाणी घरे आणि जमिनीचीही हानी झाली आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या-
- राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा.
- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे कर्ज माफ करावे.
- शेतकऱ्याला प्रति हेक्टरी ५० हजार रुपये तातडीची मदत द्यावी.
- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर आल्यानंतर २०१९ मध्ये पीक कर्ज माफ केले होते, त्या धर्तीवर या संकटातही तत्काळ निर्णय घ्यावा.
शेतकरी राजा ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. यावेळी अनेक शेतकरी उपस्थित होते. सरकारने तात्काळ पाऊले उचलून शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे आणि ओला दुष्काळ जाहीर करून पूर्णपणे नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी राजा ग्रुपने केली आहे. अन्यथा, तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.