माहिती तंत्रज्ञान जिल्हा प्रकल्प प्रमुख प्रतीक उमाटे आणि सहायक अभियंता शेखर ताकसांडेविरुद्ध गुन्हा दाखल
वर्धा (Aadhaar Fraud) :आधारसंचधारकांकडून विविध कारणांसाठी पैसे उकळत लाखो रुपयांनी फसवणूकप्रकरणी माहिती तंत्रज्ञान जिल्हा प्रकल्प प्रमुख प्रतीक उमाटे, सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनीअर शेखर ताकसांडेविरोधात (Aadhaar Fraud) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल १७ लाख ५६ हजार ४७० रुपयांनी फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
आधार संच धारकांकडून १७ लाख ५६ हजार रुपये उकळल्याचे उघडकीस, १८ व्हिएलईंच्या तक्रारी
जिल्हाधिकार्यांनी नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या चौकशीतही दोघांनी आधार संचधारकांकडून पैसे उकळल्याचे पुढे आले आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाला १८ महत्त्वाच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. जिल्हाअधिकारी कार्यालयाचे अधीक्षक तथा तहसीलदार अनिकेत सोनवणे यांच्या तक्रारीवरून प्रकल्प प्रमुख प्रतिक उमाटे आणि सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनीअर शेखर ताकसांडे या (Aadhaar Fraud) दोघांविरोधात शहर पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
जिल्हा महिला आणि बालकल्याण विभागामार्फत चालविण्यात येणार्या आधार संचधारकांनी प्रकल्प प्रमुख प्रतीक उमाटे आणि सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनीअर शेखर ताकसांडे या दोघांनी आधार संच मिळण्याकरिता अनेकांकडून अनामत रकमेशिवाय अतिरिक्त रोख रक्कम, काही जणांकडून महिन्याकाठी अतिरिक्त रक्कम, आधार किट बंद पडली असता रक्कम, ऑपरेटर बदलण्यासाठी, सॉफ्टवेअर बदलण्यासाठी प्रत्येक वेळी रोख रक्कम आदी प्रकारे पैसे उकळून आधार संचधारकांची (Aadhaar Fraud) आर्थिक फसवणूक केल्याचे उघडकीस आले.
सुमारे १८ व्हीएलईंनी जिल्हा प्रशासनाकडे पुराव्यांसह लेखी तक्रारी दाखल केल्या. त्यावरून जिल्हाधिकार्यांच्या अतिरिक्त जिल्हाअधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली. त्यात वर्धा उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक, सहाय्यक अधीक्षक यांचा सदस्य समावेश होता. चौकशी समितीने चौकशी करून याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी वान्मथी सी यांना सादर केला.