परभणी/गंगाखेड(Parbhani):- हात उसणे दिलेले साडे तीन लाख रुपये परत मागितल्यावर तलवार, गुप्ती, लोखंडी रॉड, हॉकी स्टीकने मारुन फिर्यादी व त्यांच्या सोबत असलेल्या इतरांवर जीवघेणा हल्ला(fatal attack) करण्यात आला. ही घटना ६ जून रोजी दुपारी तीनच्या सुमारास गंगाखेड शहरातील दिलकश चौक भागात घडली. या प्रकरणी गंगाखेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पैशांच्या कारणावरुन एकमेकांवर जीवघेणा हल्ला
लाल मोहम्मद सय्यद यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादीला ६ जून रोजी दुपारच्या सुमारास हरीभाऊ घोबाळे यांचा फोन आला. यावेळी फिर्यादीने त्यांच्याकडे उसण्या पैशांची मागणी (Demand for money) केली. त्यानंतर संबंधिताने संगणमत करत गैरफायद्याची मंडळी जमवून फिर्यादी व त्यांच्या सोबत असलेल्या इतर मंडळीवर जीवघेणा हल्ला केला. यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना उपचारासाठी गंगाखेड येथील शासकीय रुग्णालयात(hospital) दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना परभणीला पाठविण्यात आले. सदर प्रकरणी हरीभाऊ घोबाळे, लिंबा घोबाळे, गोविंद घोबाळे, स्वर्गेश घोबाळे, धनु साळवे व इतर दोघांवर गुन्हा नोंद झाल आहे.दरम्यान मारहाणीची ही घटना अवैध धंद्यातील(Illegal business) व्यवहारातून झाल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. जिल्हाभरात सुरू असलेल्या अवैध धंद्यावाल्यांना पोलिसांची भीती राहिली नसल्याची चर्चा जिल्हाभरात सुरू आहे आज घडलेल्या घटना हे सुद्धा अवैध धंद्यावरून झाली असल्याची जोरदार चर्चा गंगाखेड शहरात सुरू आहे
जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण
हात उसणे दिलेले तीस हजार रुपये मागितल्याच्या कारणावरुन जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण(beating) करण्यात आली. ही घटना ६ जून रोजी दुपारी पावणे तीनच्या सुमारास तहसिल कार्यालय, दिलकश चौक परिसरात घडली. सदर प्रकरणी ७ जुनला गंगाखेड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.हरीदास घोबाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अनिस सय्यद, लाल सय्यद, बालाजी डांगे, शाहरुख शेख यांच्यावर गुन्ह्याची नोंद झाली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अधिक तपास करीत आहेत.