शिवाजीराव देशमुख यांची मृत्युशी झुंज अपयशी!
रिसोड (Accident) : रिसोड-मेहकर मार्गाचे सुरू असलेल्या रस्ताकामाने अखेर पुन्हा एक बळी घेतला. 2 दिवसात 2 अपघाती बळी गेल्याने आता रस्त्या कामाबद्दल नागरीकामध्ये रोष व्यक्त होत आहे. शिवाजीराव तुकारामजी देशमुख राहणार बेदरवाडी रिसोड असे मृतकाचे नाव असुन त्यांचा दिनांक 10 ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान रिसोड-मेहकर मार्गावर पोल्ट्री फार्म समोर दुचाकी रस्ता अपघात झाला होता.
दुर्घटनेची मालिका सुरू राहणार असा प्रश्न?
सदर अपघात हा खराब रस्ता असल्याकारणाने झाला होता. या अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला जबर मार लागला असल्याने त्यांच्यावर अकोला येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या उपचारादरम्यान, त्यांचा दिनांक 14 ऑगस्ट रोजी पहाटे मृत्यु झाला. दिनांक 10 रोजी शिवाजीराव देशमुख यांच्या अपघातानंतर दिनांक 11 ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता च्या दरम्यान सदर घटनास्थळाच्या काही अंतरावर अब्दुल समद व फैसल उर्फ मौला यांच्या सुद्धा दुचाकीचा अपघात झाला होता.यामध्ये अब्दुल दाऊद यांचा घटनास्थळीत मृत्यू झाला होता. तर हा फैसल हा अजुनही मृत्युशी झुंज देत आहे. दोन दिवसात दोन रस्ता आपघाताने बळी घेतल्याने दोन्ही परिवारा वर दुखाचा डोंगर कोसळलेला आहे, दोन्ही परिवारचे छत्र हरपल्याने रिसोड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र दोन्ही अपघात हे ठेकेदाराची मनमानी व रस्ता कामातील अनियमित व तसेच कामाचे नियम धाब्यावर बसुन काम होत असल्याचे नागरिकांत चर्चा आहे. सदर काम किती दिवस चालेल व पुन्हा किती बळी घेणार ठेकेदार रस्ता कामात नागरिकांना त्या सुविधा पुरवेल का किंवा पुन्हा दुर्घटनेची मालिका सुरू राहणार असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून (Citizens) विचारला जात आहे.