आरोपीची माहिती देणार्यास ५० हजार रुपयावरून आता १ लाखाचे बक्षिस
एक लाख रूपयाचा बक्षीस
हिंगोली () : दिवसाढवळ्या निर्घृण खून करून आरोपी पत्नीसह पसार झाला सदर घटना घडून वर्षे झाले तरी आरोपी हाती येईना. यामुळे आता पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील ,पोलीस उपाधीक्षक राजकुमार केंद्रे मार्गदर्शनाखाली आरोपी माहिती देणार्याला पोलिसांनी एक लाख रूपयाच बक्षीस जाहीर केले आहे. (Supervisor murder case) आरोपी व त्याच्या पत्नीसह आरोपी शोध पत्रिका पोलिसांनी जाहीर केली आहे. एलसीबी पोलीस निरीक्षक विकास पाटील, पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे,सपोनि ज्ञानेश्वर बसवंते व पोलीस पथक नव्याने आरोपी शोध मोहीम राबवत आहेत.
आखाडा बाळापूर : येथील तालुका बीजगुणन केंद्र कार्यालयात कार्यरत कृषी पर्यवेक्षक यांचा मागील वर्षी मार्च महिन्यात खून (Supervisor murder case) झाला होता खून होउन एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला तरी आरोपी पोलीसांच्या हाती लागलेला नाही. पोलिसांनी आरोपी पकडण्यासाठी मोठ्या मोहीम राबवली परंतु आरोपी ठावठिकाणा लागला नाही. आरोपी पकडण्यासाठी पोलिसांनी आधी पन्नास हजार रूपयाच बक्षीस जाहीर केले होते. आता बक्षीस दुप्पट म्हणजे एक लाख रूपयाचे बक्षीस आरोपी माहीती देणार्यास देण्यात येणार आसल्याच पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांनी सांगितले.
आखाडा बाळापूर बसस्थानकाजवळ मुख्य रस्त्यावर तालुका बिजगुणन केंद्रात कार्यरत पर्यवेक्षक राजेश कोल्हाळ यांचा १४ मार्च २०२४ रोजी निर्घृण खून करण्यात आला होता. खून करणारा आरोपी पांडुरंग कचरु भालेराव हा खून झाला. तेव्हापासून पत्नीसह फरार झाला आहे. (Supervisor murder case) आरोपी शोधासाठी आखाडा बाळापूर पोलीस पथक, एलसीबी पोलीस पथकाने राज्यातील विविध भागात त्याचा शोध घेतला सोशल मीडियावर व पत्रक विविध भागात वाटून अनेक ठिकाणी जाऊन चौकशी पथकाने केली. परंतु आरोपी वर्ष झाले तरी पोलिसांच्या हाती लागला नाही.पोलिसांनी आरोपी शोधासाठी आधी पन्नास हजार नंतर पंचात्तर हजार व आता तब्बल एक लाख रूपयाच बक्षीस जाहीर केले आहे.