सरस्वती विद्यालय अर्जुनी/मोर च्या यशस्वीतेची वाटचाल
अर्जुनी मोर (JEE Exam) : संपूर्ण भारतात JEE ही परीक्षा काठिण्य पातळीत सर्वोच्च समजली जाते. त्यात IIT करणे हे खूप महत्त्वाचे समजले जाते. या परीक्षेत सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग12 वी ( विज्ञान) चा नियमित विद्यार्थी जय ओंकार सांगोळे याने पहिल्याच प्रयत्नात JEE या देश स्तरावरील परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले. त्याने JEE Advanced उत्तीर्ण केले असून तो भारतातील नामांकित IIT (आय आय टी) करिता पात्र ठरला आहे.
विद्यार्थ्यांच्या विविध गुणांनी व त्यांच्या प्रगतीने उंचावले
त्याच्या या नेत्रदीपक प्रगती बद्दल संस्थाध्यक्ष आ. डॉ. वल्लभदासजी भुतडा, संस्था सचिव आ. सर्वेशजी भुतडा, कोषाध्यक्ष आ. जयप्रकाशजी भैया, प्राचार्य आ.जे डी पठाण, उपप्राचार्या आ. सौ. घाटे मॅडम, पर्यवेक्षक एम. के. पालीवाल, बिसेन सर, समस्त प्राध्यापक वर्ग शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.