पाणीपुरवठा विभागाची विशेष तपासणी मोहीम
गडचिरोली (Gadchiroli Nagar Parishad) : नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने शहरातील अनधिकृत पद्धतीने नळांना जोडण्यात आलेल्या पंपांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. विभागाच्या तपासणी मोहिमेदरम्यान दोन नळांना अनाधिकृत पंप लावण्यात आल्याचे दिसून आल्याने ते जप्त करण्यात आले. पाण्याचा अधिक उपसा करण्यासाठी काही नागरिक नळांना पंप लावतात. त्यामुळे इतर नळधारकांना पाणी मिळत नाही. याबाबत प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्याने (Gadchiroli Nagar Parishad) नगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे.
शहरातील विविध भागांमध्ये आकस्मित तपासणी करताना काही ठिकाणी नळांना बेकायदेशीररित्या मोटर पंप लावलेले आढळून आले. दोन ठिकाणी अशा पंपांची जप्ती करण्यात आली आहे. संबंधित नागरिकांना तोंडी सूचना देण्यात आल्या आहेत. (Gadchiroli Nagar Parishad) नगर परिषदेकडून शहराच्या इतर भागातही ही मोहीम सुरू राहणार असून, नागरिकांनी पंप लावणे थांबवावे आणि सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांनी केले आहे.