जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचा इशारा
हिंगोली (Social media Crime) : सोशल मिडियावर अनेक जण वावरत असताना त्याचा काहीजण दुरुपयोगही घेतात. अशा घटनामध्ये दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने एखादी पोस्ट व्हायरल केली जाते. त्यामुळे तणाव निर्माण होतो. यासाठी अशी कोणतीही वादग्रस्त पोस्ट शेअर केल्यास संबंधीतावर गुन्हे दाखल (Social media Crime) केले जाणार असल्याचा इशारा जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिला आहे.
नागरीकांनी सोशल मिडियाचा वापर करताना जबाबदारीने व विवेकबुध्दीने करावी, कोणतेही आक्षेपार्ह पोस्ट, अफवा, किंवा खोटी माहिती पसरू नये तसेच अशा प्रकारच्या संदेशावर विश्वास ठेवू नये, कुठेही संशयास्पद मजकुर आढल्यास तो पुढे न पाठवता तात्काळ नजीकच्या पोलिस ठाण्याला कळवावा. दोन समाजात तेढ निर्माण करणारी पोस्ट किंवा अफवा पसरवणारी पोस्ट शेअर अथवा लाईक करणे हा गुन्हा असून हिंगोली जिल्ह्यातील व्हॉटअप, फेसबुक व (Social media Crime) सोशल मिडियावर सायबर सेलचे बारकाईने लक्ष असून वादग्रस्त पोस्ट आढळून आल्यास तात्काळ ग्रुप अॅडमिनसह पोस्ट बनविणारा, शेअर करणारा यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात येईल.
बनावट सोशल मिडिया अकाऊंटचा सुध्दा शोध घेवून वापर करणार्याविरुध्द कारवाई करण्यात येईल. मागील सहा महिन्यात हिंगोली सायबर सेल मार्फत ६७ सोशल मिडिया वापर कर्त्यांना बीएनएनएस कलम १६४ नुसार नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तसेच पाच इसमाविरुध्द गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय हिंगोली सायबर सेल, विविध सोशल मिडिया, अकाऊंटस् वर सतत नजर ठेवून आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा गुन्हेगारी उद्देशाने सोशल मिडियाचा गैरवापर करणार्यांना निश्चितपणे कायद्याला सामोरे जावे लागेल.
२०२५ मध्ये पोलिस अधिक्षक कार्यालय येथे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्या उमेदवारापैकी ६४ उमेदवारावर किरकोळ व गंभीर स्वरुपाचे गुन्हे (Social media Crime) असल्याने त्यांना शासकीय अथवा खाजगी नोकदीपासून मुकावे लागले आहे. जिल्हा पोलिसांकडून सातत्याने जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. विविध गावात व शाळा, महाविद्यालयात जागरुकता कार्यक्रम घेण्यात येत आहेत. ऑनलाईन सुरक्षितता, सायबर गुन्ह्यापासून बचाव आणि सोशल मिडियावरील जबाबदार वर्तन याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.




