१ ऑगस्ट शुक्रवारी उमेदवारी दाखल शेवटची तारीख
आखाडा बाळापूर (Akhara Balapur Bazar Samiti) : येथील बाजार समिती १८ संचालक मंडळासाठी ३० ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे.२८जुले पासून उमेदवारी दाखल प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या दिवशी ७ मंगळवारी दुसर्या दिवशी ३ व बुधवार तिसर्या दिवशी ७ असे १७ उमेदवारी अर्ज दाखल झाले तर चौथ्या दिवशी २९ असे ४६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आसल्याचे बाजार (Akhara Balapur Bazar Samiti) समितीचे निवडणूक निर्णय अधिकारी अक्षय गुठे यांनी सांगितले.१ऑगस्ट उमेदवारी दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.
आखाडा बाळापूर बाजार समिती (Akhara Balapur Bazar Samiti) निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. २८ जुलै ते १ ऑगस्ट उमेदवारी दाखल करण्यात येणार आहे.१८ संचालक मंडळासाठी ३०ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. कळमनुरी, औंढा नागनाथ, व हिंगोली तिन तालुक्यातील मिळून १६०९ मतदार आहेत.
या उमेदवारी दाखल करण्याच्या दुसर्या दिवसापर्यंत दहा जणांनी उमेदवारी दाखल केली यात विद्यमान बाजार समीतीचे सभापती दत्ता संजय बोंढारे यांनी सहकार मतदारसंघातून तसेच विद्दमान संचालक दत्ता दिलीप माने यांनी व मारोती सुर्यवंशी,वसंतराव पतंगे ,संजय भुरके अशा पाच जणांनी सहकार मतदार संघात उमेदवारी दाखल केली तर व्यापारी मतदारसंघात सुनील अमिलकंठवार , रोहीतकुमार गोयंका,भाजप जिल्हा उपाध्यक्ष महेश गोविंदवार असे तिन उमेदवारी अर्ज आले होते तर ग्रामपंचायत मतदारसंघात गणेश देशमुख एकमेव अर्ज दाखल आहे.
तिसर्या दिवशी सहकारी मतदारसंघात वंदनाबाई रामराव मगर,गजानन माणिकराव काळे, शिवाजी संवडकर, नितीन आनंदराव कदम,यांनी उमेदवारी दाखल केली तर ग्रामपंचायत मतदारसंघात दिलीप डुकरे यांनी तर अनु.जाती जमाती संजय भुरके यांनी व भटक्या विमुक्त जाती, जमाती मतदारसंघात पोले विठ्ठल उत्तमराव यांनी उमेदवारी दाखल केली होती. ३१ जुलै चौथ्या दिवशी मोठ्या प्रमाणात उमेदवारी दाखल करण्यात आली यात व्यापारी मतदारसंघात युवानेता शिवप्रसाद तेलावार, शिवचरण गोयंका,सुनील अमिलकंठवार, बाळासाहेब गावंडे, कृष्णा मधुकर लोलगे तर सहकारी मतदारसंघात अजय दत्तराव कदम, राजु भाउराव लोंढे, युवानेता ओम कदम, पराग प्रकाशराव अडकीणे, चव्हाण नामदेवराव चंदु, नंदाबाई वसंतराव पतंगे, विजय गावंडे, देशमुख यशवंत दिलीपराव, देशमुख अभिजित दिलीपराव, देशमुख गणेश मुगाराव, पवार मारोती चांदोजी, बोंढारे लक्ष्मण रावजी, निळकंठे अवधूत व ग्रामपंचायत मतदारसंघात शेख मोहम्मद इसा पाशामीयॉं, सुधाकर लोमटे,अमोल उतमराव चव्हाण, खोकले सुदाम भिमराव, बोंढारे लक्ष्मण रावजी, निळकंठे अवधूत, अडकीणे संदीप शामराव, युवानेता दयानंद मुकींदराव पतंगे, मगर विद्याधर, मगर संतोष साहेबराव इत्यादी २९ उमेदवारी अर्ज आज दाखल झाले आजपर्यंत ४६ उमेदवार अर्ज दाखल झाले असल्याच निवडणूक निर्णय अधिकारी अक्षय गुठे यांनी सांगितले.
आजपर्यंत १३८ अर्ज विक्री
बाजार समितीच्या निवडणूक (Akhara Balapur Bazar Samiti) करता आजपर्यंत ४६ उमेदवारी दाखल झाले आहे तर १३८ उमेदवारी अर्ज विक्री झाली आहे. शुक्रवारी उमेदवारी दाखल शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात उमेदवारी दाखल होण्याची चिन्हे दिसत आहे.