आखाडा बाळापूर ग्रामीण रूग्णालयातील प्रकार
आखाडा बाळापूर (Akhara Balapur Hospital) : येथील ग्रामीण रूग्णालयात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झालेल्या ४३ महिलांना कॉट अभावी चक्क जमिनीवर गाद्या टाकून झोपण्याची व्यवस्था करण्यात आली. एकीकडे गारवा वाढलेला असताना देखील रूग्णालयाने कॉटची व्यवस्था केली नसल्याने महिलांच्या नातेवाईकांसह अनेकांकडून टिका होऊ लागली आहे.
आखाडा बाळापूर (Akhara Balapur Hospital) ग्रामीण रूग्णालय ३० बेडचे असून या ठिकाणी १० बेड प्रसूतीसाठी येणार्या महिलांसाठी तर १० बेड शस्त्रक्रियेसाठी येणार्या रूग्णासाठी राखीव ठेवले जातात. उर्वरित १० बेड सर्वसाधारण रूग्णाकरीता ठेवले जातात. या रूग्णालयात ४३ महिला बिनटाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी १२ डिसेंबरला दाखल करून घेतल्या होत्या. १३ डिसेंबर शुक्रवारी हिंगोलीतील रूग्णालयाच्या तज्ञ डॉक्टरांनी महिलांवर शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर एक दिवस महिलांना थांबविण्यात आले. (Akhara Balapur Hospital) रूग्णालयात शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना झोपणसाठी कॉटची पुरेशी व्यवस्था नसल्याने रूग्णालयातर्पेâ महिलांना जमिनीवर गाद्या टाकून झोपविण्यात आले. वाढत्या थंडीत शस्त्रक्रिया झालेल्या महिला चांगल्याच गारठल्याने नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला. पुरेशी व्यवस्था नसताना शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले कशासाठी, असा प्रश्नही नातेवाईक उपस्थित करू लागले.
या प्रकारामुळे सर्वस्तरातून टिकेची झोड उठत असताना १४ डिसेंबर रोजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.वैâलास शेळके यांनी तात्काळ आखाडा बाळापूर ग्रामीण रूग्णालयात भेट देऊन चौकशी केली. या घटनेची चौकशी केल्यानंतर हिंगोलीच्या जिल्हा शासकीय रूग्णालयातून अतिरीक्त २० बेड (Akhara Balapur Hospital) आखाडा बाळापूर ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले. एकूणत: या प्रकाराबद्दल जिल्ह्यातच नव्हे तर राज्यस्तरावरही हा विषय चांगलाच गाजला. ज्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते संजय राऊत, काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनीही राज्याच्या आरोग्य विभागावर जोरदार टिकेची झोड उठविली. कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी रूग्णालयातील डॉक्टरांची पाठराखण केली असून तेथील डॉक्टर कर्तव्य दक्ष आहेत, रूग्णालयात बेड कमी होते;परंतु त्यांनी व्यवस्था चांगली ठेवून महिलांना गाद्या टाकून झोपविले. यामध्ये डॉक्टरांनी कोणतेही चुकीचे काम केले नसल्याचा निर्वाळा दिला.
आ.बाळापूर ग्रामीण रूग्णालयात शस्त्रक्रिया झालेल्या ४३ महिलांना जमिनीवर गाद्या टाकून झोपविल्याने सर्वत्र टिकेची झोड उठविली जात असताना मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
आखाडा बाळापूर ग्रामीण रूग्णालयात (Akhara Balapur Hospital) शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना बेड अभावी जमिनीवर गाद्या टाकून झोपविल्या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीरतेने दखल घेतली. त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागाचे संचालक स्वप्नील लाळे, सहाय्यक उपसंचालक राम टेके यांच्या पथकाला चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे पथक रात्री उशिरा दाखल होणार असून पथकाकडून घडलेल्या घटनेची सविस्तर चौकशी करून अहवाल सादर केला जाणार असल्याचे सुत्रांकडून कळते.