आखाडा बाळापूर (Krushi Bazar Samiti) : कृषी उत्पन्न बाजार समिती आखाडा बाळापूर १८संचालक मंडळासाठी आज उमेदवार अंतिम याद्दी जाहीर होउन उमेदवारांना चिन्हे वाटप करण्यात आले. ४७उमेदवार मैदानात आहे ग्रामपंचायत व सोसायटीच्या मतदारसंघात दुरंगी, तिरंगी लढत आहे तर अत्यंत महत्त्वाचे समजल्या जाणार्या व्यापारी मतदारसंघात सरळ लढत होते तसेच हमाल मापाडी मतदारसंघात सरळ लढत होते.
आखाडा बाळापूर बाजार समिती (Krushi Bazar Samiti) कार्यक्षेत्र कळमनुरी, औंढा नागनाथ, हिंगोली तालुक्यातील १०९ गावाचा समावेश आहे.१८संचालक पदासाठी ३०ऑगस्ट रोजी मतदान होते. मंगळवारी उमेदवारी मागे घेण्याचा शेवटच्या दिवशी ६३ उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली आता १८जागेसाठी ४७ उमेदवार मैदानात उतरले आहे.
सोसायटी मतदारसंघात : या मतदारसंघात एकुण ११जागा आहे तर मतदार ७३२आहे. यात सोसायटी गट ७ जागेसाठी रावसाहेब अडकीणे,युवामोर्चा अध्यक्ष अजय कदम, वारंगाफाटा उपसरपंच ओम कदम,दशरथ काकडे, गजानन काळे,यशवंत देशमुख, सुधाकर पतंगे, मारोतराव पवार, विद्दमान सभापती दता संजय बोंढारे, शिवसेना उपजिल्हासंघटक लक्ष्मण बोंढारे, युवानेता दत्ता माने,सुधाकर मुलगीर, राजु लोंढे, वामन विनकर, युवानेता बाजीराव संवडकर, मारोती सुर्यवंशी, राहुल हराळ हे १७ उमेदवार आहे. येथे सरळ लढत होते.
सोसायटी महिला राखीव : या मतदारसंघात दोन महिला राखीव जागेसाठी शेख आकेफुन्नीसा डॉ.मोहम्मद ईसा,नंदाबाई वसंतराव पतंगे, लताबाई मोहनराव बोथीकर,जयश्री साहेबराव शिंदे, सुवर्णमाला सुधाकर सावळे, हाके नंदाबाई दादाराव या ६ उमेदवार आहे. तिरंगी लढत होते.
इतर मागासवर्ग प्रवर्ग : सोसायटीच्या या मतदारसंघात एका जागेसाठी माजी प.स.सदस्य विजय गंगेवार, पेठवडगाव उपसरपंच सोमनाथ रणखांब व बालाजी वानखेडे तिरंगी लढत होते.
भविजा जमाती : सोसायटीच्या या मतदारसंघात एका जागेसाठी आनंता कुंडकर, निळकंठ नरोटे ,देवानंद मुलगीर तिरंगी सामना होते.
ग्रामपंचायत मतदारसंघात : या मतदारसंघात एकुण ४जागा ७४५मतदार आहे. यात सर्वसाधारण २ जागेसाठी संदीप अडकीणे, अमोल चव्हाण चिखलीकर, उपसरपंच गणेश देशमुख डोंगरगावपूल, पेठवडगाव सरपंच बालाजी देवकर, अवधूत निळकंठे अशी लढत होते सरपंच संघटना मैदानात उतरून लढतीत रंगत आणली आहे.
अनुसूचित जाती, जमाती मतदारसंघात एका जागेसाठी दिलीप डुकरे, आकाश भडंगे, संजय भुरके तिरंगी लढत होते. तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मतदारसंघात एका जागेसाठी माजी उपसरपंच दयानंद पतंगे कवडीकर व दत्तराव सावळे सरळ सामना आहे. हमाल, मापाडी मतदारसंघात : या मतदारसंघात एक जागा व ७६ मतदार आसुन यात मारोती हेंद्रे व सय्यद खुदबोद्दीन आसा सरळ सामना आहे.
व्यापारी मतदारसंघात
व्यापारी मतदारसंघात दोन संचालक पदासाठी विद्दमान संचालक सुनील अमिलकंठवार, शिवचरण गोयंका, रोहितकुमार गोयंका व लोलगे श्रीकृष्ण असे चार उमेदवार सरळ लढत होते. यावेळी सदर मतदारसंघात सर्व उमेदवार आखाडा बाळापूर येथील आहे. इतर मतदारसंघापेक्षा या मतदारसंघात निवडणूक राजकीय समीकरणे बघता गाजण्याची चिन्हे दिसत आहे.
सरपंच संघटना मैदानात उतरली
बाजार समिती निवडणूक आधी दोन प्रमुख पैनल मध्ये होण्याची चिन्हे होती परंतु नवीन राजकीय समीकरण व अंतर्गत राजकारण यातून सरपंच संघटना मैदानात उतरली आहे. सरपंच संघटना ९ उमेदवार मैदानात उभे केले आहे अस सरपंच संघटनेचे बालाजी देवकर यांनी सांगितले. ग्रामपंचायत मतदारसंघात सरपंच संघटना थेट लढतीत आहे.