अकोट (Akot Railway Accident) : अकोट रेल्वे स्टेशन परिसरामध्ये एका युवकाचा रेल्वेने कटून मृत्यू झाल्याची घटना २३ फेब्रुवारीच्या रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. अकोट रेल्वे स्टेशनवर इसमाचा मृत्यू झाल्याने हा (Akot Railway Accident) अपघात की आत्महत्या याबाबत संभ्रम आहे.
अकोटवरून रात्री आठच्या सुमारास रेल्वेचे वेळापत्रक असून अकोट रेल्वे स्टेशनवरून रात्री आठ वाजता रेल्वे गेल्याने रेल्वे स्टेशन परिसरातच हिवरखेड येथील भवानी पुरा येथे राहत असलेला संजय तुकाराम ईखार या इसमाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाला. हा (Akot Railway Accident) अपघात की आत्महत्या हे मात्र अद्याप कळू शकले नाही. सदर युवकाच्या खिशामध्ये सापडलेल्या आधार कार्ड यावरून त्याच्या नावाचा तपास पोलिसांना लागला. याप्रकरणी पुढील तपास (Akot Railway Accident) रेल्वे पोलीस करीत असल्याचे अधिकार्यांनी सांगितले आहे.