वयाच्या 21 व्या वर्षी आणखी एक मोठी कामगिरी
नवी दिल्ली (Aman Sehrawat) : भारतीय युवा कुस्ती स्टार अमन सेहरावतने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये धमाकेदार कामगिरी करत भारतासाठी कांस्यपदक जिंकले आणि 16 वर्षांपासून ऑलिम्पिकमध्ये सुरू असलेली परंपरा पुढे चालू ठेवली. (Aman Sehrawat) अमन सेहरावतने वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी ऑलिम्पिक पदक जिंकून इतिहास रचला. दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममधून बाहेर पडलेल्या अमनने आता आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. अमन सेहरावतने हा पराक्रम केला असून (Aman Sehrawat) अमनने युनायटेड वर्ल्ड रेसलिंगच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.
अमन सेहरावतने (Aman Sehrawat) कुस्ती क्रमवारीत मोठी झेप घेतली असून, इतर दिग्गजांना मागे टाकले आणि स्वतः दुसऱ्या क्रमांकावर आला. अमनच्या वर जपानचा एकच कुस्तीगीर आहे. अमनने 57 किलो वजनी गटात चांगली कामगिरी केली आहे. कांस्यपदक जिंकल्यानंतर त्याच्या क्रमवारीत झपाट्याने वाढ झाली आहे. याआधी अमन सेहरावतचे रँकिंग सहावे होते, मात्र त्याने दुसरे स्थान मिळवून सर्वांना चकित केले आहे. अमनने चार स्थानांनी झेप घेत आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. त्याच्या वर जपानच्या रे हिगुचीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. अमन अजून 21 वर्षांचा आहे, त्यामुळे नंबर वन होण्याची संधी अनेक वेळा येणार आहे.
हिगुची आणि अमनमध्ये चांगले अंतर आहे. जपानी कुस्तीपटूचे एकूण 59000 गुण आहेत. (Aman Sehrawat) अमनला 51600 गुण आहेत. त्याच्यानंतर अमेरिकेचा स्पेन्सर रिचर्ड ली तिसऱ्या क्रमांकावर आहे. उझबेकिस्तानच्या गुलोमजोन अब्दुलाएवचे नाव यादीत चौथ्या स्थानावर आहे.