भेटला विठ्ठल माझा…
धर्मवीर आ. संजूभाऊकडून शिवाराच्या राऊळी, कष्टकरी विठू-रुक्माईची पाद्यपूजा!
▪️आषाढी एकादशी पावली- आ. गायकवाड
▪️विठ्ठल संजूभाऊंना पावेल- मुक्ताई पवार
हडोळती (Ambadas Pawar) : आषाढीसाठी नेते पंढरपूरला पोहोचत असताना, शिवसेना आमदार संजय गायकवाड मुंबई ते लातूर व्हाया बुलढाणा असा 900 किलोमीटरचा प्रवास पोहोचले ते लातूर जिल्ह्यातील अहमदनगर तालुक्यातील हाडोळती या गावच्या शिवारात, ज्याठिकाणी एक शेतकरी वृद्ध दांपत्य खांद्यावर जू घेऊन औत ओढत होते, तो व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाल्यानंतर, विधिमंडळात (Legislature) एकच गदारोळ उडाला व संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली त्याठिकाणी लातूर, नांदेड व बुलढाणा जिल्ह्यातील अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या (Shiv-Sena Officials) उपस्थितीत आ. संजूभाऊंनी 76 वर्षीय अंबादास व मुक्ताई पवार या शेतकरी दांपत्याचे पाद्यपूजन करून त्यांना तिलक करत त्यांच्या गळ्यात हार टाकून दोन पातळ व धोतरजोडी शर्ट-टावेल-टोपी देऊन जेव्हा त्यांचा सत्कार (Felicitation) केला, त्यावेळी जणू विठू माऊलीचा पंढरीत जागर व्हावा. तसे भक्तीमय वातावरण त्या शिवाराच्या राऊळी निर्माण झाले होते, गजर झाला श्री संत गजानन महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांचा, यानंतर त्या दांपत्याला खास कर्नाटकाहून आणलेली सव्वा लाखाची खिल्लारी बैलजोडी भेट देण्यात आली. सोबतच 50 हजाराची आर्थिक मदत (Financial Aid) व वर्षभराचा किराणा देण्यात आला. आभाळ फाटलेलं असताना आभाळासारखा धावून आलेला नेता पाहून या दांपत्याचे अश्रू अनावर झाले, याचठिकाणी आषाढी एकादशी पावली, असे उद्गार आ. गायकवाड यांनी काढल्यानंतर, तुम्हालाही विठ्ठल पावेल संजूभाऊ, असे आशिर्वाद मुक्ताई पवार यांनी दिले. यावेळी मुक्ताईने चुलीवर तयार केलेली चटणी-भाकर थरथरत्या हाताने या दांपत्याने संजूभाऊंना भरविली व संजूभाऊंनी त्या दोघांना घास भरविला. तो प्रसंग सर्वांच्या डोळ्यात आणून गेला, पाणी!
गावच्या शिवारात हा भावनिक सोहळा ओलावून जाणारा ठरला!
भेटला विठ्ठल माझा. हे गाणे ‘धर्मवीर’ चित्रपटातील, धर्मवीर ही उपाधी मिळालेले आमदार संजय गायकवाड यांना तसाच विठ्ठल आज शनिवार 5 जुलै रोजी भेटला तो वयोवृद्ध शेतकरी अंबादास पवार व रुक्माई भेटली ती मुक्ताबाई पवार यांच्या रूपाने. आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) पूर्वसंध्येला हडोळती जि. लातूर या गावच्या शिवारात हा भावनिक सोहळा ओलावून जाणारा ठरला.
प्रामुख्याने उपस्थिती!
मुंबई अधिवेशनाचा (Mumbai Session) पहिला आठवडा आटोपून रात्रभराचा प्रवास करत सकाळी 4 वाजता आ. संजय गायकवाड बुलढाणा पोहचले. तिथून शिवसेना पदाधिकाऱ्यांना घेऊन सकाळी 5 वाजता ते निघाले लातूरकडे. आंबेजोगाईवरून त्यांनी लातूर जिल्हाप्रमुख ब्रह्मानंद केंद्रे, तालुकाप्रमुख गोपीनाथ जायभाये, महिला आघाडी जिल्हाप्रमुख उर्मिला भगत, तालुकाप्रमुख शहरप्रमुख लक्ष्मण अलगुले, चाकूर शहरप्रमुख प्रल्हाद जाधव, शहरप्रमुख श्रीकांत गायकवाड, प्रवीण जाधव, देवानंद दांडगे, बाळासाहेब नारखेडे, नितीन सुपे, अजय बिल्लारी, शैलेश कुलकर्णी, बंडू आसाबे, योगेश परसे, सागर घट्टे व ऋषिकेश बिराजदार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
शेकडो किलोमीटर आमदार शेतकऱ्याची अशी दखल घेतो, या परिसराला सुखावून जाणारी होती..
हडोळतीला पोहोचल्यावर आ. संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी थेट पवार दांपत्याचे शिवार गाठले. या दांपत्याला बैलजोडी देण्याचा निर्धार त्यांनी मुंबई अधिवेशनादरम्यानच व्यक्त केला होता, ठरल्याप्रमाणे शनिवारी सकाळी 11:30 पर्यंत ते तिथे पोहोचले. यावेळी अनेक गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते. शेकडो किलोमीटर दूरवरून एखादा आमदार शेतकऱ्याची अशी दखल घेतो, या परिसराला सुखावून जाणारी होती.
त्या पत्रकारांचाही केला सत्कार!
साधारणत: एखादी घटना पुढे येते, परंतु ती घटना जगापुढे आणणारा पत्रकार हा कायम दुर्लक्षित असतो. ते शेतकरी दांपत्य जगापुढे आणले ते ‘देशोन्नती’चे स्थानिक पत्रकार विश्वनाथ हिंगणे व सामनाचे प्रतिनिधी वसंत पवार यांनी. हे वृत्त सर्वात प्रथम छापून आले होते, ते ‘दै. देशोन्नती’ मध्ये. या दोन्ही पत्रकारांचा आ. संजूभाऊ यांनी सत्कार करून या दोघांनासुद्धा प्रत्येकी 10 हजार रुपयांचे पारितोषिक दिले. या मागचा उद्देश एवढाच की, अशा वेदनादायी घटना जगापुढे आणण्याचे प्रोत्साहन पत्रकारांना (Journalist) प्रोत्साहन मिळावे !