जीवित हानी टळली!
औसा (Ambulance Fire) : औसा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या 108 ॲम्बुलन्सला आग लागून ॲम्बुलन्स जळून खाक झाली. गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान ॲम्बुलन्समध्ये कोणीही नव्हते, त्यामुळे जीवित हानी टळली.
ॲम्बुलन्ससह वाहन पार्किंगसाठी जागा उपलब्ध नाही!
औसा ग्रामीण रुग्णालय इमारतीचे बांधकाम सध्या चालू आहे. त्यामुळे सद्यस्थितीत असलेली इमारतीच्या भागापैकी किमान 75 टक्के इमारत नष्ट करण्यात आली आहे. यामुळे ॲम्बुलन्ससह वाहन पार्किंगसाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे ग्रामीण रुग्णालय आणि दिवाणी न्यायालय या दोन्हींच्या मध्ये असलेल्या रस्त्यावर सदरील ॲम्बुलन्स उभे होती.
गाडीच्या वायरिंगमध्ये पार्किंग झाल्याने ही आग लागल्या असावी, असा अंदाज!
औसा ग्रामीण रुग्णालयातून (Ausa Rural Hospital) रुग्णाला लातूरच्या रुग्णालयात रेफर करायचे असल्यामुळे या ॲम्बुलन्सला कॉल केला होता. त्यासाठी चालकाने ॲम्बुलन्स (Ambulance) सुरू करण्याचा प्रयत्न केला असता, बोनेट मधून धूर आल्याने त्याने पुन्हा एकदा गाडीचे इंजिन खोलून पाहिले. तसेच संबंधित डॉक्टरांना गाडीतून धूर येत असल्याचे सांगून थांबविले. त्यानंतर संबंधित चालकाने गाडीच्या इंजिनमध्ये नेमके काय झाले हे पाहून गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला असता गाडीने पेट घेतला. गाडीच्या वायरिंगमध्ये पार्किंग झाल्याने ही आग लागल्या असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला तातडीने माहिती दिली!
गाडीला आग लागल्याचे कळताच औसा ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉक्टर सुनिता पाटील (Doctor Sunita Patil) यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. याबाबत औसा नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला (Fire Department) तातडीने माहिती दिली. मात्र घटनास्थळी गाडी येण्यास 10 मिनिटे लागल्याने तोपर्यंत, ॲम्बुलन्स जळून खाक झाली होती. डॉक्टर पाटील यांनी औसा पोलिसांना (Ausa Police) या घटनेबाबत कळविताच औसा पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. याबाबत गुन्हा नोंद (Crime Record) करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत, सुरू होती.
गाडीला कॉल दिला होता!
रुग्णालयातून लातूरला पेशंट रेफर करण्यासाठी आपण गाडीला कॉल दिला होता. मात्र गाडीमध्ये प्रॉब्लेम असल्याचे चालकाच्या लक्षात आल्याने त्याने रुग्णालयात (Hospital) येत गाडीमध्ये प्रॉब्लेम आहे, असे सांगितले. तो सांगून परत जाईपर्यंत गाडीने मागून पेट घेतला होता. गाडी संपूर्ण जळून खाक झाली.
– डॉ. सुनिता पाटील, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, औसा




 
			 
		

