२७ घरातील लाखोंची घरगुती उपकरणे जळून खाक | ७८७५३६४८४३ हाच तो क्रमांक ज्याला मिळत नाही दाद
देशोन्नती वृत्तसंकलन
अमरावती ( Amravati ) परतवाडा गुरुवार दुपारी २ वाजताच्या सुमारास अचानक विजेचा दाब वाढल्याने अचलपूर शहरातील अब्बासपुरा- सरमसपूरा परिसरातील २७ विद्युत ग्राहकांच्या घरातील दूरचित्रवाणी संच, कुलर, पंखा, फ्रिज, मिक्सर, होम थिएटर, कॉम्प्युटर, ( Computer ) इन्व्हर्टर यासारखी विद्युत उपकरणे जळाली. त्यामुळे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. या भागातील विद्युत ग्राहकांच्या म्हणण्यानुसार गेल्या १० दिवसापासून अनियमित विद्युत पुरवठा होत आहे याबाबत ग्राहकांच्या तक्रारीला दाद देत नाही अचलपूर शहरातील ( Achalpur city ) अब्बासपुरा, सरमसपुरा या परिसरातील विद्युत पुरवठा ( Power supply) नेहमीच अनियमित असतो. ग्राहक अनेकदा अभियंत्याना माहिती देऊनसुध्दा त्याची दखल घेत नाही. त्यांचा संपर्क क्रमांकावर फोन करूनसुध्दा योग्य उत्तर दिल्या जात नाही गोस्वामी यांचे कामकाज ग्राहकांना त्रासदायक ठरत आहे. अभिजित बोरकर, अनिल बोरकर, योगेश शहाने, श्रीराम पाटील, सुरेश मिनप्रसाद गोलाईत, शोभा पाटणकर, गणेश बोरवार, नागोराव बोरकर या विद्युत ग्राहकाच्या घरातील उपकरणाचे मोक्याप्रमाणात नुकसान झाले आहे विद्युत वितरण कंपनीच्या अभियंत्यांना माहिती देऊनसुध्दा कुठलीच कार्यवाही केली नाही. अचलपूर येथील कार्यालयात वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता कुठलीच दाद दिली जात नाही. सर्वसामान्य कुटूंबाच्या घरातील घरगुती उपकरणे जळाल्याने मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या परिसरातील विद्युत पुरवठा जगदंबा देवी डीबीवरून केल्या जातो. ६ जून रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास विजेचा दाब ( Electric pressure ) अचानक वाढला. त्यामुळे घरातील उपकरणे खराब झाली. यामध्ये सुधीर राईकवार राजेश बोकडे, विठ्ठल डाहाके, सुरेश रोडगे, प्रविण कोल्हे, मो. जावेद, भास्कर कोरडे, चंद्रशेखर पखाले, दिलीप पखाले, अब्दुल बशीर, रमेशबोरकर, मनोज बोरकर, गजानन धुळधर, विक्की बोरकर, स्वप्नील खोकले, प्रशांत वाठ, गोविंदराव खडगे, राजेश फिस्के, विक्की बोरकर, राजेश फिस्के, दामोदर कराळे, अभिजित बोरकर, अनिल बोरकर, योगेश शहाने, श्रीराम पाटील, सुरेश मिरगे प्रल्हाद गोलाईत, शोभा पाटणकर, गणेश बोरवार, नागोराव बोरकर या विद्युत ग्राहकांच्या घरातील उपकरणांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.
ग्राहकांच्या तक्रारीला दाद देत नाही
अचलपूर शहरातील अब्बासपुरा, सरमसपुरा ( Abbaspura, Sarmaspura ) या परिसरातील विद्युत पुरवठा नेहमीच अनियमित असतो. ग्राहक अनेकदा अभियंत्यांना माहिती देऊनसुध्दा त्याची दखल घेत नाही. त्यांचा संपर्क क्रमांकावर फोन करून सुध्दा योग्य उत्तर दिल्या जात नाही. गोस्वामी यांचे कामकाज ग्राहकांना त्रासदायक ठरत आहे.
– योगेश शहाने, अचलपूर
ग्राहकांच्या नुकसानाची भरपाई केल्या जाईल
अचलपूर शहरातील अब्बासपुरा, सरमसपुरा या परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अचानक दाब वाढला. त्यात ज्या ग्राहकांच्या उपकरणांचे नुकसान झाले, त्यांनी रीतसर अर्ज केल्यास योग्य तपासणीनंतर पात्र ठरलेल्या ग्राहकांना नुकसान भरपाई दिल्या जाईल. ग्राहकांनी सुरक्षेच्या अनुषंगाने अर्थिग असलेल्या श्रीपिन सॉकेटचा वापर करावा. आकाशात वीज कडकडाडत असेल तर वीज उपकरणे बंद ( Power off the equipment ) करून प्लग काढून ठेवावे.
– गोस्वामी, कनिष्ठ अभियंता