महागांव (Yawatmal) :- तालुक्यातील गुंज येथील गणेश चवरे या व्यक्तीच्या बँक (Bank) खात्यातून तब्बल अडीच लाख रुपये अज्ञात व्यक्तीने उडवल्याचा धक्कादार प्रकार समोर आला आहे. गुंज येथील नागरिकाने महागांव पोलीस स्टेशन (Police station) येथे धाव घेत अज्ञात विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
प्राप्त माहितीनुसार गुंज येथील रहिवासी गणेश चवरे या व्यक्तीचे महागांवच्या युनियन बँक (Union Bank) खात्यात १,९९,८९९ रु होते तर दुसरीकडे स्टेट बँकेमध्ये २९, ८०० रु होते. त्या व्यक्तीचे आधार कार्ड ब्लॉक करून नवीन सिम कार्ड घेऊन अज्ञात व्यक्तीने दोन्ही बँक खात्यातून तब्बल अडीच लाख रुपयांच्या जवळपास ऑनलाईन पद्धतीने पैसे उडवले. ही घटना चवरे यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस स्टेशन येथे धाव घेऊन अज्ञात व्यक्तविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास महागांव पोलीस स्टेशन करीत आहे.




