फिरत्या पथकाने दिलेल्या गोळयांचे सेवन केल्याने प्रकृती बिघडल्याचा अंदाज
चामोर्शी (Anantapur students) : तालुक्यातील अनंतपूर येथे सामकी माता विद्या विकास मंडळ द्वारा चालविण्यात येत असलेल्या स्व. सूरजमल चव्हाण माध्यमिक आश्रम शाळा व स्व. सुधाकर नाईक वि.जा. भ.ज. कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय रेखेगाव – अनंतपूर शाळेतील जवळपास ४१ विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने (Anantapur students) त्यांना चामोर्शी येथील ग्रामीण रूग्णालयात तसेच गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या फिरत्या वेैद्यकीय पथकाने विद्यार्थ्यांना दिलेल्या गोळया सेवन केल्याने विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याचे निदर्शनास आले आहे.
अनंतपूर येथील स्व. सूरजमल चव्हाण आश्रम शाळा व स्व.सुधाकर नाईक वी जा.भ. जा कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय व वसंतराव नाईक आश्रम शाळा या तिन्ही शाळेतील पहिली ते बारावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्याना १२ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास जेवण केल्यानंतर काही विद्यार्थ्यांना ताप, मळमळ, चक्कर,उलटी ,सर्दी खोकला आदींची लक्षणे दिसुन आली. तेव्हा त्या (Anantapur students) विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचारासाठी जवळच्या आमगाव महाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सायंकाळच्या सुमारास दाखल करण्यात आले होते. त्यापैकी सात विद्यार्थ्यांना रात्री ९.३० च्या सुमारास चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या दरम्यान पुन्हा ३४ विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आले.
अशाएकूण ४१ विद्यार्थ्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन त्यांची तपासणी करण्यात आली. दरम्यान त्यातील अश्वीता दुर्गम (१६), सानवी पानीक (१०) , सिंदुजा कोटाला( १०) , वैशाली चौधरी (१६) , रजनिका धारावत (१५) , वसुंधरा निलम (१०) , दिक्षा झोडे(११), वैशाली दुर्गम (१०), अर्चना निलम (१८ ), विनयकुमार तुकूम (११) अशा एकूण दहा विद्यार्थ्यांना गडचिरोली येथे रेफर करण्यात आले .असून उर्वरित विद्यार्थ्याची प्रकृती स्थिर, चांगली आहे . आश्रमशाळेचे शिक्षक रमेश गोरलावार विद्यार्थ्याची देखरेखी साठी उपस्थित आहेत.
चामोर्शी ग्रामीण रूग्णालयात भरती विद्यार्थ्याची प्रकृती स्थिर आहे. (Anantapur students) विद्यार्थ्यांना अन्नातून किंव्हा पाण्यातून विष बाधा होऊ शकते असा प्राथमिक अंदाज असून तपासणी अहवाल आल्यावरच नक्की कारण सांगता येईल अशी माहिती चामोर्शी ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रविणकुमार किलनाके यांनी दिली.
आरोग्य विभागाने दिलेल्या गोळयांचा परीणाम असण्याची शक्यता: गोवर्धन चव्हाण
या संदर्भात संस्थाध्यक्ष गोवर्धन चव्हाण यांना विचारणा केली असता त्यांनी आरोग्य विभागाकडून (Anantapur students) विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या गोळया विद्यार्थ्यांनी सेवन केल्याने व वातावरणातील बदलामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परीणाम झाला असल्याची शक्यता चव्हाण यांनी व्यक्त केली.




 
			 
		

