रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
नागपूर (Anil Deshmukh) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Maharashtra Elections 2024) प्रचाराचा काल शेवटचा दिवस होता. प्रचार तोफा थंडावल्यानंतर काल रात्री माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. या हल्ल्यात अनिल देशमुख जखमी झाले. त्यांना काल रात्री उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज अनिल देशमुख यांना डिस्चार्ज मिळाला असून, त्यांनी या हल्लाबाबत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
VIDEO | "I want to tell BJP people, whether you hit me with a stone or even shoot me, Anil Deshmukh will not die. We will not rest without teaching you a lesson," says former Maharashtra minister and NCP (SP) leader Anil Deshmukh (@AnilDeshmukhNCP) after being discharged from the… pic.twitter.com/DpRzMW9DqN
— Press Trust of India (@PTI_News) November 19, 2024
काल हल्ल्यात जखमी झालेल्या अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना आज डिस्चार्ज मिळाल्यानंतर, त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ‘मी मरणार नाही, आणि तुम्हालाही सोडणार नाही, आपल्यावर ज्याने कोणी हल्ला केला, त्याला सोडणार नाही, असे अनिल देशमुख म्हणाले. यादरम्यान (Anil Deshmukh) अनिल देशमुख यांच्या वाहनावर झालेल्या हल्लानंतर राजकीय वातावरण तापले आहे. विरोधी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रतिआरोप पहायला मिळत आहे.
Video of Anil Deshmukh, former Minister, after the incident. He reportedly sustained injuries after a few individuals pelted stones at his car in Katol Legislative Assembly Constituency. He was on his way back after a public meeting in Narkhed. His son, Salil Deshmukh, is… pic.twitter.com/C61IoqM2yr
— Anjaya Anparthi (@anjaya1905) November 18, 2024
येथे CLICK करा: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला
काल विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Elections 2024) प्रचाराचा शेवटचा दिवस होता. काटोल विधानसभा मतदारसंघामधील नरखेडमधील सभा संपल्यानंतर (Anil Deshmukh) अनिल देशमुख परत येत असतांना हा हल्ला करण्यात आला. अनिल देशमुखांची (Anil Deshmukh) गाडी काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. माहितीनुसार गाडीवर फेकण्यात आलेल्या दगडामुळे समोरील काचे फुटली. त्या काचेचे तुकडे अनिल देशमुखांच्या डोक्याला लागून, गंभीर जखम झाली. त्यानंतर त्यांना काटोल रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज मिळताच त्यांनी आपल्यावर हल्ला करणाऱ्याला सोडणार नाही, असा इशारा (Anil Deshmukh) दिला आहे.