सहा मास रेडमध्ये बहात्तर लाखाचा मुद्देमाल जप्त
हिंगोली (Anti-illegal campaign) : १ मे ते ३१ मे दरम्यान, नांदेड परिक्षेत्रात ‘अवैध व्यवसाय विरोधी अभियान-१’ चे आयोजन करण्यात आले आहे. मागील विधानसभा निवडणुकीदरम्यान, परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना (Anti-illegal campaign) पायबंद घालण्यासाठी, परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर या चारही जिल्ह्यांत एकाच वेळी मासरेडचे आयोजन करण्यात आले होते. विधानसभा निवडणुकी दरम्यान अशा एकूण सहा मासरेड आयोजित करण्यात आल्या होत्या व त्यायोगे अवैध व्यवसायांविरोधात मोठ्या स्वरूपाच्या कारवाया झाल्या होत्या.
नांदेड जिल्ह्यात 412 ठिकाणी मारलेल्या छाप्यात 419 आरोपीवर गुन्हे दाखल करून 18,47,110 मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच परभणी जिल्ह्यात 280 ठिकाणी मारलेल्या छाप्यात 283 गुन्हे दाखल करून 13,76,631 मुद्देमाल जप्त केला. तसेच हिंगोली जिल्ह्यात 166 ठिकाणी मारलेल्या छाप्यात 177 जनांवर गुन्हे दाखल करून 5,43,416 मुद्देमाल जप्त केला.
लातूर जिल्ह्यातील 412 ठिकाणी मारलेल्या छाप्यात 347 आरोपींवर (Anti-illegal campaign) गुन्हे दाखल करून 34,57,652 मुद्देमाल जप्त करण्यात आला. एकूण 1270 ठिकाणी मारलेल्या छाप्यामध्ये 1226 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. एकूण सहा मास रेडमध्ये 72 लाख 24 हजार 809 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चालू महिन्यात दिनांक 13 एप्रिल रोजी परिक्षेत्रात अवैध व्यावसायिकांचे विरुद्ध आणखी एक मासरेड आयोजित करण्यात आली होती. सदर मासरेडचे दरम्यान देखील चारही जिल्ह्यात एकूण (268) आरोपीविरुद्ध, (267) केसेस करण्यात आल्या होत्या व त्यायोगे (13,27,487) रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला होता.
तथापि, परिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध दारू, मटका, जुगार, ऑनलाइन लॉटरी, क्रिकेट बॅटिंग, गुटखा, अंमली पदार्थ, वेश्याव्यवसाय, वाळू उपसा व वाहतूक, अवैध प्रवासी वाहतूक इत्यादींना आळा घालण्याकामी व्यापक मोहिमेची (Anti-illegal campaign) आवश्यकता लक्षात घेऊन १ मे पासून म्हणजे महाराष्ट्र दिनापासून परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांत’ अवैध व्यवसाय विरोधी अभियान-1′ चे आयोजन करण्यात आले आहे.
सदर मोहिमेत, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, अंमलदार यांचेसह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व अपर पोलीस अधीक्षक हे सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे, स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पोलीस पथके ही देखील कारवाईत सहभागी होणार असून, संबंधित जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हे अवैध व्यवसाय विरोधी कारवायांवर देखरेख ठेवणार आहेत.
सदर मोहिमेदरम्यान, सातत्याने अवैध व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध तडीपार, एम.पी.डी.ए. व प्रकरण परत्वे मोक्का कायद्याखाली देखील कारवाई करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपल्या भागातील (Anti-illegal campaign) अवैध व्यवसायांची माहिती, नागरिकांनी नजीकच्या पोलीस ठाण्यास अथवा पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाच्या nandedrange.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर कळवून आपल्या भागातील अवैध व्यवसायांचा बिमोड करण्यासाठी आपला हातभार लावावा, असे आवाहन पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.




