जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी क्रीडा, सांस्कृतिक महोत्सव उत्साहात
देशोन्नती वृत्तसंकलन
अमरावती () : जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी क्रीडा, सांस्कृतिक महोत्सव (Sports-Cultural Festival) दिनांक ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान उत्साहात व यशस्विरित्या पार पडला. यावेळी गठीत करण्यात आलेल्या सोळा समित्यांनी आपापली जबाबदारी सांभाळून कर्तव्य बजावले. त्यामुळे हा चार दिवसीय क्रीडा महोत्सव शांततेत यशस्वी झाला. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात या महोत्सवाचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते गुरुवारी (दि.३०) उदघाटन झाले. त्याच दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम झाला. तर, क्रिकेट व इतर सांघिक व वैयक्तिक खेळ विभागीय क्रीडा संकुलात झाले.
अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गाजविले मैदान
फुटबॉलचे सर्व खेळ सायंस्कोर मैदानावर घेण्यात आले तर स्विमिंगची स्पर्धा रंगोली प्रिया पार्क रेवसा रोड येथे घेण्यात आली. या (Sports-Cultural Festival) महोत्सवाच्या यशस्वितेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्र यांच्या सूचनेनुसार उपमुख्यकार्यकारी अधिकारी तथा क्रीडा महोत्सवाचे सचिव बालासाहेब बायस, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. अरविंद मोहरे, उपशिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण १६ समित्या गठीत करण्यात आल्या होत्या. या समितीतील २१७ शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिग्रहित करण्यात आली होती. या समितीतील प्रत्येक सदस्यांनी आपापली जबाबदारी सांभाळत कर्तव्य बजावले. त्यामुळे हा महोत्सव यशस्विरित्या पार पडला. या (Sports-Cultural Festival) क्रीडा महोत्सवात सुमारे तीन हजार अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. दरम्यान,मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्र यांनी सर्व समिती प्रमुख व सदस्यांचे यशस्वी कामगिरीबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.
सांस्कृतिकचा घेतला मनमुराद आनंद
विविध समितीमध्ये कार्यालयीन समितीचे प्रमुख क्रीडा संयोजक तथा गटशिक्षणाधिकारी डॉ. नितीन उंडे हे होते. त्यांच्या साथीला सतिश नांदने, मनोज खोडके, दिनेश देशमुख, पंकज देशमुख, मनोज चोरपगार, धनराज कुंजेकर, सचिन वावरकर, मनिष काळे आदी होते. गटशिक्षणाधिकारी सपना भोगावकर व कल्पना ठाकरे ह्या सांस्कृतिक समितीच्या प्रमुख होत्या. तर, सदस्य म्हणून नीता सोमवंशी, रंजना काळपांडे, प्रगती तिजारे, सविता सुपटकर, सुरेश चिमणकर, संध्या शिंदे, शीला मसराम, गजानन देशमुख, कल्पना देशमुख, स्नेहल दिवाण, वृषाली देशमुख, वैशाली काळे, अंजली होले, प्रांजली तायडे, भावना ठाकरे, प्रियंका काळे, वर्षा चव्हाण, शेख शकील यांनी काम केले.
प्रशासन अधिकारी संजय राठी यांच्यावर स्वागत व स्टेज समितीची जबाबदारी होती. त्यांना गजानन कोरडे, विजय कविटकर, अजय अडीकणे, शैलेंद्र दहातोंडे, नितीन देशमुख, संजय काकड, सुषमा बेलसरे, रुपाली झंझाड, विजय येते, अरुणा घुगे, सुषमा बगाडे, प्रीती कडू, सुनीता गाडे, सुवर्णा ठाकरे, अर्चना दांदळे, वैशाली कापसे, डॉ. सुनिता लहाने यांनी सहकार्य केले. गटशिक्षणाधिकारी श्री. बी. आर. गिरासे हे नोंदणी समितीचे प्रमुख होते. त्यांच्या सोबतीला विकास भडांगे, रवींद्र झाकडे, अशीपुर रेहमान, संगीता गवई, अमोल गिरी, संजय पेटले, गीतांजली गायकवाड, रश्मी यावले, नादिर खान, अर्चना चिंचोळकर, दिनेश सवाई, धर्मेंद्र वानखडे, अक्षय खरकडे, संजय बोबडे, सुभाष बेंडे, पंकज राऊत, विजय डवले, सबा शेख हे होते.
गटशिक्षणाधिकारी संदीप बोडखे यांचेकडे अन्न- भोजन समितीचा पदभार होता. त्यांना राजेंद्र दीक्षित, हेमंत दातीर, संतोष चव्हाण, विजय कपाळे, चंद्रकांत मामनकर, विजया धंदरे, नीता सोमवंशी, मोहम्मद युसूफ, संजय गेडाम, शिवलाल बोरकर, संगीता कडू, शुभांगी देशमुख, निलिमा गरपाळ, किशोर मालोकर, राजू डांगे, अनिल डाखोरे, रा.ना.गावंडे, गजानन लेंडे यांनी सहकार्य केले. गटशिक्षणाधिकारी संतोष घुगे यांनी पुरुषाच्या मैदानाची जबाबदारी सांभाळली. त्यांना साहेबराव परतेती, राजेश वाकोडे, ज्ञानेश्वर धमे, वीरेंद्र मोरे, वसंत लोहेकर, संदीप धांडे, संजय काकड, अमोल पवार, महेंद्र काळे, मोहम्मद इर्शाद, मोहम्मद आरिफ उर रहमान, शैलेश चौकसे, शाहनवाज अहमद, शेख मुजुबुद्दीन, अविनाश राठोड, प्रमोद कडू यांनी सहकार्य केले.
शापोआ अधिक्षक गुणवंत वरघट यांचेकडे महिलांच्या मैदानाची जबाबदारी होती. त्यांना ऋषिकेश कोकाटे, आल्हाद तराळ, नंदकिशोर कळसकर, पंजाब अधिक, मनोज काळे, नितीन पवार, सारिका सुपल, जया चोखट, वंदना आघमकर, रजनी वानखडे, राजकुमार खर्चान, डी.एम. राणे, राजेंद्र वांगे, श्रीकांत मुघल, सुनील साबळे, राखी कडू, राजेंद्र खोडे यांनी सहकार्य केले. मुख्याध्यापक विनायक लकडे हे प्रसिद्धी समितीचे प्रमुख होते. त्यांना शकील अहमद, राजेश सावरकर, श्रीनाथ वानखडे यांनी सहकार्य केले. फेसबुक लाईव्ह हेमंत यावले, जीवन घोषणा यांनी केले तर सोशल मिडिया किशोर रूपनारायण, सुरज मंडे यांनी सांभाळला.
शिक्षण विस्तार अधिकारी गंगाधर मोहने यांच्यावर निर्णय समितीची जबाबदारी होती. या (Sports-Cultural Festival) समितीत धनंजय वानखडे, प्रज्ञा भनवरे, डॉ. नितिन उंडे, वकार अहमद, संजय राठी, पंकज गुल्हाने, रवींद्र दिवाण होते. गटशिक्षणाधिकारी दीपक कोकतरे यांची आरोग्य समिती होती. त्यांना संजय आष्टुनकर, संतोष चव्हाण, नरेश ब्राह्मण, किशोर गणवीर, सचिन इंगोले, ज्ञानेश्वर घोडेस्वार, दिनेश पाटील, चंद्रकांत कडबे, सतीश वानखडे, छाया मिरासे, वैशाली वऱ्हाडे, अलका लुंगे, कल्पना गुडधे, संगीता क्षीरसागर, जयश्री धोटे यांनी सहकार्य केले.
गटशिक्षणाधिकारी धनंजय वानखडे यांचेकडे बक्षिस वितरण समिती जबाबदारी होती. त्यांना चंद्रशेखर रामटेके, अनिल कोल्हे, मनोज खोडके, कैलास कावणपूरे, अतुल देशमुख, सतीश मनोहर, मनोज पाल, अनिल डाखोडे, सरफराज खान यांनी सहकार्य केले. गटशिक्षणाधिकारी राम चौधरी हे स्वच्छता समितीचे प्रमुख होते. त्यांना मंगेश राऊत, संजय भडांगे, ए.मुनीफ ए.गफुर, राजेंद्र वाघ, दर्शना टोपले, सिमा पाटील, सतीश तळे, संतोष मनवरे, प्रमोद दखणे यांनी सहकार्य केले.
शिक्षण विस्तार अधिकारी डी. सी. गायकवाड यांची पाणीपुरवठा समितीची जबाबदारी होती. त्यांना एम, बी, वांगे, प्रदिप लोखंडे, संदिप खडेकार, राजेश निंभोरकर, शंकर कवाणे, दर्शन गंधे, डि.एस.कांदे, योगेश कोथळे, विश्वनाथ चव्हाण, अमोल पोकळे, खुशाल गुल्हाणे, रामेश्वर स्वर्गीय, दिपक लढे, राजू चव्हाण, संजय गेडाम, निलेश चौधरी, पवन मेश्राम यांनी सहकार्य करून पार पाडली. शिक्षण विस्तार अधिकारी प्रवीण खांडेकर हे मदत कक्ष समिती प्रमुख होते. त्यांच्या सोबतीला गजानन खोपे, प्रवीण ढोके, विजय खानझोडे, सुनिता राऊत, प्रवीण कडू, राम महाजन, गजानन मोरे, दीपक काळे, जावेद इक्बाल जोहर, शहजाद अहमद, विनोद राठोड, उमेश आकोडे, शफीवली मोहम्मद शेख, अजय मुराडे, हिम्मत डोंगरे होते.
शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रशेखर रामटेके यांचेकडे वैयक्तिक स्पर्धेची जबाबदारी होती. त्यांना राहुल ब्राम्हण, नंदकिशोर कळसकर, संजय गोंडाणे, दिनेश नगरकर, राजु झाकडे, राजाभाऊ राजनकर, प्राप्ती इंगळे यांनी सहकार्य केले. केंद्रप्रमुख राजेश बोंडे हे खेळ व साहित्य पुरवठा समितीचे प्रमुख होते. त्यांना अनिल जाधव, रमेश राठोड, संजय गोंडाणे, विकास रेखाते, नरेंद्र धनस्कर, सीमा बोरेकर, सचिन वावरकर, सुधीर कवणे, प्रफुल्ल भोरे, सुनील भुगुल यांनी सहकार्य केले.
मुख्याध्यापक आशिष भुयार यांचेकडे क्रिकेटचे नियोजन होते. त्यांना नयन काळपांडे, दिनेश साबळे, विवेक देशमुख, हेमंतकुमार यावले, आशिष देशमुख, देवेंद्र विहीर, अतुल देशमुख यांनी सहकार्य केल्याने हा (Sports-Cultural Festival) क्रीडा महोत्सव यशस्वीरीत्या पार पडला. मैदानाची जबाबदारी पार पाडण्यासाठी खेळ समन्वयकाची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी त्यांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. सर्व अधिकारी, कर्मचारी व शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.