500 Crore Audio Clip

मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपची SIT चौकशी; क्लिप देण्यास तयारी, मात्र जरांगेंनी घातली मोठी अट!

मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपची SIT चौकशी! क्लिप देण्यास तयारी, मात्र स्रोत सांगण्यापूर्वी सुरक्षेची हमी मागितली.

मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपची SIT चौकशी; क्लिप देण्यास तयारी, मात्र जरांगेंनी घातली मोठी अट!

ऑडिओ क्लिपचा स्रोतही तपास यंत्रणेला सांगणार; मात्र माहिती देणाऱ्या व्यक्तीच्या सुरक्षेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी हमी द्यावी, अशी मागणी

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ५०० कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहारासंदर्भातील ऑडिओ क्लिप सार्वजनिक केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या क्लिपमधील संभाषणावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. आता या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी विशेष तपास पथकाची (SIT) नियुक्ती करण्यात आली असून, तपास यंत्रणेने जरांगे पाटील यांच्याशी संपर्क साधला आहे.

या ऑडिओ क्लिपमध्ये मनोज जरांगे पाटील यांना ५०० कोटी रुपये दिल्याचा उल्लेख असल्याचा दावा करण्यात आला होता. यावर प्रतिक्रिया देताना आपल्या नावाचा वापर करून भाजपकडून कोणी पैसे घेतले आहेत का आणि प्रत्यक्षात आपल्याला ही रक्कम मिळाली आहे का, असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला होता.

पत्रकार परिषदेत ऑडिओ क्लिप ऐकवल्यानंतर चौकशी समितीने जरांगे यांना पत्र पाठवून संबंधित ध्वनिफीत तपासासाठी सादर करण्याची मागणी केली. त्यावर क्लिप तपास यंत्रणेकडे देण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. एवढेच नव्हे, तर ऑडिओ क्लिप नेमकी कुठून मिळाली, याचा स्रोतही सांगण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ऑडिओ क्लिप देण्यास तयारी; जरांगेंची सुरक्षेची अट

संबंधित ऑडिओ क्लिपचा स्रोत तपास अधिकाऱ्यांना सांगण्यास आपली हरकत नसल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मात्र, ज्या व्यक्तीकडून ही क्लिप मिळाली आहे, तिच्या जीविताला कोणताही धोका निर्माण होणार नाही, याची खात्री सरकारने द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित व्यक्तीच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी. तिच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही, याची शाश्वती मिळाल्यानंतरच पुढील माहिती देणार असल्याचे जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

शैलेश बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय SIT

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना विशेष तपास पथक स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

या समितीकडून ऑडिओ क्लिपची सत्यता, त्यातील संभाषण आणि त्यामागील व्यक्तींची माहिती तपासली जाणार आहे. क्लिपमधील दाव्यांमागे नेमके तथ्य काय आहे, याचा शोध घेण्याचे आव्हान तपास यंत्रणेसमोर आहे.

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाचाही उल्लेख

संबंधित ऑडिओ क्लिपमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांना ५०० कोटी रुपये देण्यात आल्याचा कथित उल्लेख असल्याचा दावा करण्यात आला होता. या दाव्यामुळे राजकीय वातावरण तापले होते.

या संपूर्ण प्रकरणाची कोणत्याही राजकीय दबावाशिवाय निष्पक्ष चौकशी व्हावी आणि ऑडिओ क्लिपमागे असलेल्या सूत्रधारांची ओळख उघड व्हावी, अशी मागणी जरांगे पाटील यांनी सरकारकडे केली आहे.

आता जरांगे पाटील यांच्याकडून ऑडिओ क्लिप आणि तिचा स्रोत तपास यंत्रणेला कधी उपलब्ध करून दिला जातो, तसेच एसआयटीच्या चौकशीतून कोणती माहिती समोर येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


 

संबंधित सामग्री

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे १२ मोठे निर्णय! पाहा संपूर्ण यादी

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे १२ मोठे निर्णय! पाहा संपूर्ण यादी

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे १२ मोठे निर्णय! ओबीसी विद्यार्थ्यांचा भत्ता वाढला, वाहनधारकांना ई-चलनात सवलत आणि नागपूरमध्ये ६४४ कोटींच्या कृषी प्रकल्पाला मंजुरी.

Nov 04, 2026
आयुष्मान खुरानाला लॉरेन्स गँगकडून धमकी? कोट्यवधी रुपयांची मागणी करणारा ऑडिओ मेसेज, पोलिसांकडून तपास सुरू

आयुष्मान खुरानाला लॉरेन्स गँगकडून धमकी? कोट्यवधी रुपयांची मागणी करणारा ऑडिओ मेसेज, पोलिसांकडून तपास सुरू

आयुष्मान खुरानाला लॉरेन्स गँगच्या नावाने धमकीचा ऑडिओ मेसेज? कोट्यवधींच्या मागणीचा दावा; पोलिसांकडून आवाजाची पडताळणी सुरू.

Nov 04, 2026
अनिल अंबानींच्या अडचणीत मोठी वाढ! ED कडून ५१० कोटींची मालमत्ता जप्त; दोन खासगी विमानांचाही समावेश

अनिल अंबानींच्या अडचणीत मोठी वाढ! ED कडून ५१० कोटींची मालमत्ता जप्त; दोन खासगी विमानांचाही समावेश

अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ED ची मोठी कारवाई! ५१० कोटींची मालमत्ता आणि दोन खासगी विमाने जप्त; एकूण जप्ती २३ हजार कोटींवर.

Nov 04, 2026
संजय राऊतांचा शिंदे गटावर मोठा दावा; म्हणाले, 'आता तीन एकनाथ शिंदे तयार झाले, अमित शाह-फडणवीसांकडून ताकद'

संजय राऊतांचा शिंदे गटावर मोठा दावा; म्हणाले, 'आता तीन एकनाथ शिंदे तयार झाले, अमित शाह-फडणवीसांकडून ताकद'

संजय राऊतांचा शिंदे गटावर निशाणा! तीन एकनाथ शिंदे तयार झाल्याचा दावा; अमित शाह, फडणवीस आणि गोकुळ निवडणुकीवरूनही टीका.

Nov 04, 2026
पुणेकरांनो सावधान! डेंग्यूचा वाढता धोका, महापालिका ॲक्शन मोडवर

पुणेकरांनो सावधान! डेंग्यूचा वाढता धोका, महापालिका ॲक्शन मोडवर

पुण्यात ऑक्टोबरमध्ये डेंग्यूचे ८४३ रुग्ण; औंध-बाणेरमध्ये सर्वाधिक १५२ रुग्ण. महापालिका आरोग्य विभागाकडून विशेष पाहणी आणि प्रतिबंधात्मक कारवाई.

Nov 04, 2026