हिंगोली मारहाण प्रकरण

मारहाण प्रकरणी आरोपीस सहा महिने सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड

Hingoli beating case हिंगोलीतील एका हत्येच्या प्रयत्नाच्या प्रकरणात जिल्हा न्यायाधिश श्रीमती एस. एन. माने-गाडेकर यांनी आरोपी सम्राट अशोक श्रीरंग जावळे

मारहाण प्रकरणी आरोपीस सहा महिने सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड

Hingoli beating case

 

जिल्हा न्यायाधिश श्रीमती एस. एन. माने - गाडेकर यांनी सुनावला निकाल 

हिंगोली (Hingoli beating case) : तालुक्यातील नर्सी नामदेव ते कडती जाणार्‍या रस्त्यावर कयाधू नदीच्या पुला समोर रस्त्यावर एकास मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी एका आरोपीला ३ आरोपी पैकी दोषी ठरविलेल्या मुख्य एका आरोपीला सश्रम कारावासाची शिक्षा जिल्हा न्यायाधिश श्रीमती एस.एस. माने, गाडेकर यांनी सुनावली. 

याबाबत सरकारी अभियोक्ता एस.एस. मुटकुळे  यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिलेली माहिती अशी की, नर्सी नामदेव ते कडती रस्त्यावर कयाधू नदीच्या पुला समोरील रस्त्यावर भुजंग पडघान हा अ‍ॅटो क्रमांक एमएच ३८ - ३७२० हा साक्षिदारासह चालवत असताना ७ मार्च २०१६ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास आरोपी सम्राट अशोक श्रीरंग जावळे, राजू आनंदा खंदारे, निशांत रामराव राऊत यांनी संगणमत करून भुजंग पडघान यांच्या मोटार सायकलचा पाठलाग करून अनैतिक संबंधाच्या कारणावरून जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केल्या प्रकरणी  नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून या तिन्ही आरोपी विरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

या (Hingoli beating case) गुन्ह्याचा तपास तत्कालिन सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. एन. चकोर यांनी करून हिंगोली जिल्हा न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. ११ मे रोजी जिल्हा न्यायाधिश श्रीमती एस. एन. माने - गाडेकर यांनी एकुण ३ आरोपी पैकी सम्राट अशोक श्रीरंग जावळे रा वरूड गवळी याला दोषी ठरवून सहा महिने सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्या तीन महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली. तसेच कलम ३०७ भादवीमध्ये तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. एस. एन. मुटकुळे यांनी साक्षिदार तपासले व अंतिम युक्तीवाद केला. या प्रकरणी सहाय्यक सरकारी वकील एस.डी. कुटे, श्रीमती सविता एस. देशमुख (जाधव) यांनी सहकार्य केले. तसेच कोर्ट पैरवी सहाय्यक उपनिरीक्षक श्रीमती जे.एन. खिल्लारे यांनी सहकार्य केले.

संबंधित सामग्री

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

Hingoli firecracker godown accident: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात सांगितले..

Oct 07, 2026
फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026