आलापल्ली ग्रामपंचायत कार्यालयात शॉर्टसर्किटमुळे आग; जीवितहानी टळली

अहेरी तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या आलापल्ली ग्रामपंचायत कार्यालयात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. A

आलापल्ली ग्रामपंचायत कार्यालयात शॉर्टसर्किटमुळे आग; जीवितहानी टळली

Aheri Fire Incident

अहेरी (Aheri Fire Incident) : अहेरी तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या आलापल्ली ग्रामपंचायत कार्यालयात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून महत्त्वाची कागदपत्रेही सुरक्षित राहिली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान उन्हाचा तीव्र तडाखा आणि विजेच्या दाबातील चढ-उतार यामुळे कार्यालयात शॉर्टसर्किट झाले. त्या वेळी कार्यालय सुरू होते आणि कर्मचारी तसेच काही नागरिक उपस्थित होते. अचानक वीजपुरवठा खंडित झाला आणि एका इलेक्ट्रिक बोर्डाला आग लागली. त्यामुळे कार्यालयात धुराचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच उपस्थित कर्मचारी आणि नागरिकांनी तत्परता दाखवत आग आटोक्यात आणली. त्यामुळे आग इतरत्र पसरण्यापासून रोखली गेली. आगीमुळे कोणतेही मोठे आर्थिक नुकसान झाले नसल्याचे ग्रामविकास अधिकारी चालीगंजेवार यांनी स्पष्ट केले.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, कार्यालयातील कामकाज सुरू असताना ही घटना घडल्याने मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त होत आहे. सुट्टीचा दिवस असता तर परिस्थिती अधिक गंभीर झाली असती, अशी चिंता ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित सामग्री

स्टेअरिंग लॉक झाल्याने बस पलटली; ३८ प्रवासी जखमी, गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील घटना

स्टेअरिंग लॉक झाल्याने बस पलटली; ३८ प्रवासी जखमी, गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील घटना

गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील शिवणी गावाजवळ एसटी बस पलटली.

Sep 18, 2026
गडचिरोलीत स्कार्पिओमध्ये वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचाऱ्याचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम

गडचिरोलीत स्कार्पिओमध्ये वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचाऱ्याचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम

स्कार्पिओ वाहनात वैद्यकीय महाविद्यालयात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले केतन पोचमपल्लीवार मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली.

Sep 06, 2026
शॉर्ट सर्किटमुळे ऊस जळाला; तीन लाखांहून अधिक नुकसान

शॉर्ट सर्किटमुळे ऊस जळाला; तीन लाखांहून अधिक नुकसान

गंगाखेड तालुक्यातील ईसाद शिवार शेतात शॉर्ट सर्किटमुळे ४ एकरावरील उभा ऊस आगाने नाश झाले. कमलबाई नारायण लोखंडे यांच्या शेतातील वातावरणामध्ये जळणे अघोळल्याने आग झाली. आगाने ४ तेरेआडीच तीन एकरावरील ऊस नाश झाल्यानंतर शेतकऱ्यांना एक लाखांहून अधिक नुकसान झाले. पोलिसांचे तपास होत आहे

Sep 05, 2026
गडचिरोलीत पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के; सिरोंच्यात ३.६ तीव्रतेची नोंद

गडचिरोलीत पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के; सिरोंच्यात ३.६ तीव्रतेची नोंद

गडचिरोली जिल्ह्यात गुरुवारी (दि. ३ सप्टेंबर) पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली.

Sep 03, 2026
कोरचीतील रस्ते खड्डेमय; ३ कोटींच्या निधीच्या ‘तुकड्यां’वर सवाल!

कोरचीतील रस्ते खड्डेमय; ३ कोटींच्या निधीच्या ‘तुकड्यां’वर सवाल!

नगरपंचायतीचा दर्जा मिळून दशक पूर्ण होण्याच्या मार्गावर असतानाही कोरची शहरातील रस्त्यांची अवस्था मात्र दिवसेंदिवस बिकट होत आहे.

Aug 27, 2026