Amravati Double Murder

अमरावती मध्ये कबूतर चोरीच्या वादातून दोन जिवलग मित्रांच्या हत्येप्रकरणी वलगावचे सरपंच अटकेत; ७ आरोपींना बेड्या

अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे दोन जिवलग मित्रांच्या निर्घृण हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत वलगावचे सरपंच सुधीर उगले यांच्यासह सात आरोपींना अटक केली आहे.

अमरावती मध्ये कबूतर चोरीच्या वादातून दोन जिवलग मित्रांच्या हत्येप्रकरणी वलगावचे सरपंच अटकेत; ७ आरोपींना बेड्या

अमरावती दुहेरी हत्याकांडात मोठी कारवाई; पाच मुख्य आरोपींसह सरपंच सुधीर उगले यांनाही अटक

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे दोन जिवलग मित्रांच्या निर्घृण हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत वलगावचे सरपंच सुधीर उगले यांच्यासह सात आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणातील पाच मुख्य आरोपींसह सरपंचालाही बेड्या ठोकण्यात आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. सर्व आरोपींना आज अमरावती जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील वलगाव बसस्थानक परिसरात मध्यरात्री दोन तरुणांवर धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यात संजोग जोशी (वय २४) आणि ऋतिक पंडित (वय २५) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

तपासादरम्यान, कबूतर चोरल्याच्या वादातून हा दुहेरी खून झाल्याचे समोर आले आहे. जुन्या आणि किरकोळ वादाचे रूपांतर हिंसक संघर्षात झाले आणि त्यातून दोन्ही तरुणांचा जीव गेल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पाच हल्लेखोरांनी वलगाव बसस्थानक परिसरात दोन्ही मित्रांवर अत्यंत क्रूरपणे हल्ला केला. धारदार शस्त्राने सपासप वार केल्यामुळे संजोग जोशी आणि ऋतिक पंडित यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या प्रकरणातील पाचही मुख्य आरोपी हे सुमारे २५ वर्षे वयोगटातील असल्याचे समोर आले आहे. तपासादरम्यान या गुन्ह्यात वलगावचे सरपंच सुधीर उगले यांचा सहभाग आढळून आल्याने त्यांनाही अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास वलगाव पोलीस करत असून सर्व आरोपींना आज अमरावती जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

संबंधित सामग्री

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
दुहेरी खून प्रकरणात पाच जणांना जन्मठेप! 

दुहेरी खून प्रकरणात पाच जणांना जन्मठेप! 

Latur Double Murder Case: डांगेवाडी येथे पाणंद रस्त्याच्या वादातून झालेल्या दुहेरी खून प्रकरणात पाच आरोपींना निलंगा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने 29 सप्टेंबर 2026 रोजी जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावल

Sep 30, 2026
ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंचा संताप; ‘कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या’ उडाल्याचा आरोप

ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंचा संताप; ‘कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या’ उडाल्याचा आरोप

ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया; कायदा-सुव्यवस्थेवर सवाल करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी.

Sep 30, 2026