Atrocity Case

पीडित कुटुंबाला जिल्हाधिकाऱ्यांचा धीर

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आखाडा बाळापूर येथील ॲट्रॉसिटी प्रकरणातील मयत पंजाबराव मोरे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन मदत व सुरक्षेबाबत विचारपूस केली.

पीडित कुटुंबाला जिल्हाधिकाऱ्यांचा धीर

Atrocity Case

सेवा संकल्प अभियानांतर्गत आखाडा बाळापूर येथे भेट; शासकीय मदत व सुरक्षेबाबत केली विचारपूस

आखाडा बाळापूर : सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज आखाडा बाळापूर येथील ॲट्रॉसिटी प्रकरणातील मयत पंजाबराव मोरे यांच्या कुटुंबीयांची त्यांच्या घरी भेट घेऊन विचारपूस केली. कुटुंबीयांना येणाऱ्या अडचणी जाणून घेत जिल्हा प्रशासन त्यांच्या पाठीशी असल्याचा धीर त्यांनी दिला.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार पीडित कुटुंबाला मिळणाऱ्या अर्थसहाय्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घेतली. तसेच पीडित कुटुंबातील पात्र सदस्याला शासकीय नोकरी देण्याबाबतची कार्यवाही व संबंधित प्रक्रियेची माहिती त्यांनी दिली.

आरोपींकडून कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा धमकी होत असल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी कुटुंबीयांना सांगितले. त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य केले जाईल, असेही ते म्हणाले.

यावेळी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. मरे, समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त गीता गुठ्ठे आदी उपस्थित होते.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

Oct 06, 2026