Aundha Nagnath Temple

श्री नागनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी; दर्शनासाठी सहा ते सात तास रांगा

हिंदू धर्मातील पवित्र श्रावण महिना सुरू असल्याने शनिवार, रविवार तसेच श्रावण सोमवारी श्री नागनाथाच्या दर्शनासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी होत आहे.

श्री नागनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी; दर्शनासाठी सहा ते सात तास रांगा

Aundha Nagnath Temple

श्रावण महिना, पालखी-दिंडी सोहळे आणि शनिवारच्या सुट्टीमुळे औंढा नागनाथमध्ये शिवभक्तांची मोठी गर्दी

औंढा नागनाथ : श्रावण महिन्यानिमित्त आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. पालखी-दिंडी सोहळे आणि कावड यात्रांमधून मोठ्या संख्येने भाविक येथे दाखल होत असून, शनिवारी सुट्टी असल्याने मंदिर परिसरात दिवसभर दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मंदिर संस्थानकडून रांगेतील भाविकांसाठी पिण्याच्या पाण्यासह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

हिंदू धर्मातील पवित्र श्रावण महिना सुरू असल्याने शनिवार, रविवार तसेच श्रावण सोमवारी श्री नागनाथाच्या दर्शनासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी होत आहे. वाढती गर्दी लक्षात घेऊन मंदिर संस्थानकडून गर्भगृहातील अभिषेक बंद करण्यात आला आहे.

दररोज मंदिराचे मुख्य पुजारी तुळजाराज भोपी, बंडू भोपी आणि रामेश्वर गुरव यांच्या हस्ते पहाटे चार वाजता श्री नागनाथाचे दैनंदिन धार्मिक विधी पार पाडले जातात. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी भाविकांसाठी खुले करण्यात येते.

भाविकांना दर्शनासाठी रांगेत सहा ते सात तास प्रतीक्षा करावी लागत असल्याने मंदिर संस्थानकडून त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्यासह इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

मंदिर सल्लागार समितीचे अध्यक्ष आमदार संतोष बांगर, मंदिराचे अध्यक्ष तहसीलदार हरीश गाडे, अधीक्षक वैजनाथ पवार, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ आणि मंदिर सुरक्षा प्रमुख बबन सोनूणे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापन करण्यात येत आहे.

यामध्ये मंदिर गार्ड जगदेव दिंडे, नामदेव पाटील, संजय मोरे, मंचक सोळंके, चेअरमन गणेश जगताप, मुकेश पडोळे, सचिन सोनटक्के, प्रदीप जोशी, नागेश माने, गणेश उदगीरे, कृष्णा पाटील, देवा देशमुख, भगवान शिंदे, आकाश सोनूणे, दशरथ राठोड, नितीन दराडे, प्रवीण गोबाडे, सुरेखा शिंदे, नंदा चोंढेकर, अनूराधा खूळखूळे आणि शोभा करंजीकर यांच्यासह पोलीस प्रशासन गर्दीवर नियंत्रण ठेवत आहे.

भाविकांना लवकरात लवकर दर्शन मिळावे यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरात पोलिसांचाही बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

Oct 06, 2026