मुंबई: 'धुरंधर' चित्रपटातील अभिनेत्री आयेशा खान हिने विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. इंस्टाग्राम स्टोरीद्वारे तिने अनेक व्हिडिओ शेअर करत आपला अनुभव मांडला असून, त्यामध्ये आपण कोणतेही आंदोलन करत नसताना केवळ रस्त्यावर शांतपणे उभे असल्यामुळे पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे तिने म्हटले आहे.
SHOCKING : Shararat Girl #AyeshaKhan detained by Police for Standing Peacefully on Road 😭😳
— Review Bollywood (@ReviewBollywoo1) July 22, 2026
She was not even protesting!! pic.twitter.com/ojICwATw6D
शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये आयेशा खान पोलिसांच्या वाहनात बसलेली दिसते. या व्हिडिओत ती म्हणते की, "माझे हात अक्षरशः थरथरत आहेत. मी फक्त रस्त्यावर शांतपणे उभी होते. त्यासाठीच मला पोलिसांच्या वाहनात ताब्यात घेण्यात आले."
आयेशाने पुढे दावा केला की, तिने आंदोलनाची सुरुवात केली नव्हती किंवा कोणत्याही प्रकारच्या निदर्शनात सक्रिय सहभाग घेतला नव्हता. तिचा भाऊ आणि काही पुरुष मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे ती घटनास्थळी रस्त्यावर उभी होती, असे तिने स्पष्ट केले.
तिने शेअर केलेल्या आणखी एका व्हिडिओमध्ये एका तरुणाने आपली गणिताची प्रात्यक्षिक परीक्षा असल्याचे सांगितले. कोणतेही कारण न देता आपल्याला ताब्यात घेण्यात आल्याचा दावा त्याने केला असून, परीक्षा चुकल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी चिंता त्याने व्यक्त केली.
दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये आयेशा खान पोलिसांना "आम्हाला कुठे घेऊन जात आहात?" असा प्रश्न विचारताना दिसते. मात्र, या प्रश्नाचे कोणतेही उत्तर पोलिसांकडून मिळाले नसल्याचा दावा तिने केला आहे.
#Dhurandhar item song girl #AyeshaKhan detained at Worli police station, as she went to participate in protest against #NEET exams in Dadar, Mumbai. pic.twitter.com/EqQJeU06db
— $@M (@SAMTHEBESTEST_) July 22, 2026
याशिवाय, आणखी एका व्हिडिओमध्ये चार महिला पोलीस तिला जबरदस्तीने पोलिसांच्या वाहनात बसवत असल्याचे दिसते. त्या व्हिडिओसोबत तिने लिहिले की, "दुर्दैवाने मला वाहनात बसवण्यासाठी चार महिला पोलिसांची गरज पडली. पण माझा प्रश्न तोच आहे—का? मी गोंधळ घातला होता का? मी कोणाशी वाद घातला होता का? मला नेमके कशासाठी ताब्यात घेतले? मी फक्त रस्त्यावर उभी होते. पाच जणांच्या गटाचाही मी भाग नव्हते."
आयेशा खानने सोशल मीडियावर केलेल्या या दाव्यांनंतर संबंधित व्हिडिओ मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहेत.