बहिणीचा मृत्यू

भावाच्या लग्नाला आलेल्या बहिणीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, लग्नसमारंभात दुःखाचे सावट

Electric Shock Death: चंद्रपूरमध्ये एका लग्नसमारंभात नवरदेवाच्या बहिणीस विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे आनंदी वातावरण दुःखमय झाले.

भावाच्या लग्नाला आलेल्या बहिणीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, लग्नसमारंभात दुःखाचे सावट

Electric Shock Death

चंद्रपूर/नागभीड (Electric Shock Death) : भावाच्या घरी लग्नानंतर स्वागत समारंभाची तयारी सुरू असताना नवरदेवाच्या बहिणीस विजेचा धक्का लागला आणि यातच तिचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना सोमवारी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान नागभीड येथे घडली. स्नेहा विशाल वरभे (३८) रा भद्रावती असे मृतक महिलेचे नाव असून नागभीड येथील तिचा भाऊ अक्षय बाबुराव कायरकर याचा लग्न रविवारी ब्रम्हपुरी येथे थाटामाटात पार पडला . तर आज सोमवारी नागभीड येथे स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती . त्यामुळे घरात आनंदी वातावरण होते.

या स्वागत समारंभाच्या तयारीत घरचे सर्वच गुंतले होते. त्यात स्नेहाचाही समावेश होता. स्नेहा काही तरी धुण्यासाठी घराच्या गल्लीत गेली आणि तिचा हाताचा एका विद्युत वायरला स्पर्श झाला. आणि तिला धक्का बसला. हा धक्का एवढा तीव्र असावा की, काही कळायच्या आत क्षणात ती खाली कोसळली. तिथेच उभे असलेल्या इतर नातेवाईकांच्या लक्षात ही बाब आली आणि क्षणाचाही विलंब न लावता तिला येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र तिची अवस्था लक्षात घेता शासकीय रूग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. लगेच तिला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र काही अवधीतच तिचा मृत्यू झाला. आणि बघता बघता आनंददायी वातावरण दुःखमय बनले. अकस्मात घडलेल्या या दुर्दैवी घटनेने सर्व कायरकर व वरभे परिवार हादरुन गेला आहे*. सदर मृतक महिलेला पती व दोन जुळे  मुलं आहेत, सदर घटनेबद्दल नागभीड येथे हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित सामग्री

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
शस्त्राने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; चोंडीआंबा टि-पॉईंट पेट्रोलपंपा जवळील घटना

शस्त्राने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; चोंडीआंबा टि-पॉईंट पेट्रोलपंपा जवळील घटना

Chondiamba Armed Attack Death: वसमत तालुक्यातील चोंडी आंबा टी-पॉईंटवरील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर असलेल्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या आवारात ६ ऑक्टोबर मंगळवार रोजी धारदार शस्त्राने हल्ला

Oct 06, 2026
अविनाश बांगरच्या शौर्याचा शेवट; दुसर्‍यासाठी जीव दिला: स्वत काळाच्या पडद्या आड गेला

अविनाश बांगरच्या शौर्याचा शेवट; दुसर्‍यासाठी जीव दिला: स्वत काळाच्या पडद्या आड गेला

Avinash Bangar's death: हिंगोली येथे फटाक्याच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगी अविनाश काशिनाथ बांगर यांनी दुसर्‍यांचे प्राण वाचवण्यासाठी धाव घेतली आणि या प्रयत्नातच त्यांनी स्वतःचा प्राण गमावला.

Oct 06, 2026
सिगारेट ओढणाऱ्यांपासून सावध! ‘स्मोकर’जवळ थांबणेही धोकादायक...

सिगारेट ओढणाऱ्यांपासून सावध! ‘स्मोकर’जवळ थांबणेही धोकादायक...

India Smoking Deaths: सिगारेट ओढणारी व्यक्ती स्वतःच्या आरोग्याला धोका निर्माण करतेच; मात्र तिच्या आसपास असलेल्या धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींनाही त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते.

Oct 06, 2026
माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये

माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये

Livestock Electric Accidental Death: महावितरणच्या विद्युत वाहिन्या, खांब, रोहित्र किंवा अन्य विद्युत उपकरणांमुळे झालेल्या अपघातात पशुधनाचा मृत्यू झाल्यास शेतकरी आणि पशुपालकांना मिळणाऱ्या नुकसान भरपाई

Oct 05, 2026