Baramati ST Bus Accident

बारामतीतील सुपे घाटात एसटी बस पलटी; २५ ते ३० विद्यार्थ्यांचा प्रवास, २ ते ३ जखमी

बारामतीतील पाटस-सुपा मार्गावरील सुपे घाटात शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस पलटी झाली. २५ ते ३० विद्यार्थ्यांपैकी २ ते ३ जण किरकोळ जखमी झाले असून, इतर विद्यार्थी सुरक्षित आहेत.

बारामतीतील सुपे घाटात एसटी बस पलटी; २५ ते ३० विद्यार्थ्यांचा प्रवास, २ ते ३ जखमी

Baramati ST Bus Accident

पाटसहून सुप्याकडे जाताना चालकाचे नियंत्रण सुटले; किरकोळ जखमी विद्यार्थ्यांवर चौफुल्यात उपचार

बारामती तालुक्यातील पाटस-सुपा मार्गावर शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसला सुपे घाटात अपघात झाला. घाट चढताना बस अचानक मागे सरकली आणि काही अंतरावर जाऊन पलटी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या बसमध्ये सुमारे २५ ते ३० विद्यार्थी प्रवास करत होते. त्यापैकी २ ते ३ विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली असून, उर्वरित विद्यार्थी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच २० बीएल ३१२१ क्रमांकाची बारामती डेपोची एसटी बस पाटसहून सुप्याच्या दिशेने निघाली होती. यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुपे घाटातून बस पुढे जात असताना घाट चढण्याच्या वेळी अचानक बस मागे घसरू लागली. चालकाने बस नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला; मात्र बस काही अंतर मागे गेल्यानंतर पलटी झाली. या घटनेमुळे बसमधील विद्यार्थ्यांमध्ये काही काळ घबराट निर्माण झाली.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. सुपे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून मदतकार्य केले.

दुर्घटनेत जखमी झालेल्या दोन ते तीन विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी चौफुला येथील हर्ष हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झालेली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान, बसमधील इतर विद्यार्थ्यांची पोलिसांसह संबंधितांकडून तपासणी करण्यात आली. जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात पाठवल्यानंतर सुरक्षित असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

या अपघातामुळे पाटस-सुपा मार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. बस नेमकी कोणत्या कारणामुळे मागे सरकली, तसेच बसमध्ये काही तांत्रिक बिघाड होता का, याचा तपास पोलीस आणि संबंधित विभागाकडून सुरू आहे.

संबंधित सामग्री

DMartच्या कमाईत मोठी वाढ; महसूल 19 हजार कोटींच्या पुढे

DMartच्या कमाईत मोठी वाढ; महसूल 19 हजार कोटींच्या पुढे

DMartच्या दुसऱ्या तिमाहीच्या महसुलात 18.4% वाढ झाली असून कंपनीचा स्वतंत्र महसूल 19,206.18 कोटींवर पोहोचला. स्टोअर्सची संख्या 518 वर गेली.

Oct 04, 2026
नोएडाच्या सुपरनोव्हा सोसायटीत धक्कादायक घटना; ४३व्या मजल्यावरून उडी घेत तरुणाची आत्महत्या

नोएडाच्या सुपरनोव्हा सोसायटीत धक्कादायक घटना; ४३व्या मजल्यावरून उडी घेत तरुणाची आत्महत्या

नोएडाच्या सेक्टर-९४ येथील सुपरनोव्हा सोसायटीत गुरुग्रामच्या संभव जैन या तरुणाने ४३व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. पोलिसांचा तपास सुरू आहे.

Oct 03, 2026
सुपर एल निनोचा जगाला मोठा धोका; ४.५१ लाख अतिरिक्त मृत्यूंचा अंदाज, भारतात १५,८०० मृत्यूंची शक्यता

सुपर एल निनोचा जगाला मोठा धोका; ४.५१ लाख अतिरिक्त मृत्यूंचा अंदाज, भारतात १५,८०० मृत्यूंची शक्यता

सुपर एल निनोमुळे जगभरात ४.५१ लाख अतिरिक्त मृत्यूंचा अंदाज असून भारतात १५,८०० मृत्यूंची शक्यता. महाराष्ट्रातही १००% दुष्काळाचा इशारा.

Sep 24, 2026
बागेश्वर धाम पुन्हा चर्चेत; पर्चीत ‘पुत्रयोग’चा दावा, मात्र चौथीही मुलगी; राजेंद्र कुमार यांची तक्रार

बागेश्वर धाम पुन्हा चर्चेत; पर्चीत ‘पुत्रयोग’चा दावा, मात्र चौथीही मुलगी; राजेंद्र कुमार यांची तक्रार

बागेश्वर धामच्या ‘पुत्रयोग’ दाव्यावरून वाद; चौथी मुलगी झाल्यानंतर झांशीतील भक्ताची फसवणुकीची तक्रार, अंनिसचे 1 कोटींचे आव्हान.

Sep 22, 2026
गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवा; ‘डीजे’ला फाटा द्या!

गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवा; ‘डीजे’ला फाटा द्या!

कळमनुरीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक झाली. पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यासह ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी डीजेचा वापर न करण्याचे आवाहन केले.

Sep 13, 2026