Best Tehsildar

उत्कृष्ट तहसीलदार म्हणून अभिजित जगताप यांचा महसूल दिनी गौरव

माहूर तालुक्यात महसूल विभागाच्या माध्यमातून नागरिकांना जलद सेवा उपलब्ध करून देत उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल महसूल दिनानिमित्त सन्मान करण्यात आला.

उत्कृष्ट तहसीलदार म्हणून अभिजित जगताप यांचा महसूल दिनी गौरव

माहूरसारख्या दुर्गम तालुक्यात नागरिकाभिमुख व पारदर्शक प्रशासनाची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल जिल्हास्तरीय सन्मान

माहूर (नांदेड) : आदिवासी, बंजारा बहुल तसेच दुर्गम आणि डोंगराळ भौगोलिक परिस्थिती असलेल्या माहूर तालुक्यात महसूल विभागाच्या माध्यमातून नागरिकांना जलद, पारदर्शक आणि प्रभावी प्रशासकीय सेवा उपलब्ध करून देत उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल तहसीलदार अभिजित जगताप यांचा उत्कृष्ट तहसीलदार म्हणून दि. ६ रोजी महसूल दिनानिमित्त सन्मान करण्यात आला.

जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात अप्पर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, पोलिस अधीक्षक निलाभ रोहण, मनपा आयुक्त महेश डोईफोडे, सहाय्यक जिल्हाधिकारी बि. श्रवण, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी प्रियंका पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

माहूरसारख्या दुर्गम तालुक्यात गेल्या एका वर्षापासून कार्यरत असलेले तहसीलदार अभिजित जगताप यांनी महसूल विभागातील विविध कामकाजात गती आणत नागरिकाभिमुख प्रशासनाची प्रभावी अंमलबजावणी केली. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असलेले विविध दाखले, नागरिकांना लागणारी उत्पन्न, जात, अधिवास, नॉन-क्रीमीलेअर आदी प्रमाणपत्रे तसेच शासनाच्या विविध योजनांशी संबंधित प्रशासकीय कामे शासनाने निश्चित करून दिलेल्या कालमर्यादेत पूर्ण करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.

त्यांच्या कार्यकाळात नागरिकांना कार्यालयीन कामांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी वेळेत सेवा देण्याबरोबरच महसूल विभागाच्या कामकाजात पारदर्शकता, शिस्त आणि उत्तरदायित्व जपण्यात आले. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल जिल्हा प्रशासनाने घेत महसूल दिनानिमित्त दि. ६ रोजी नांदेड येथील कै. शंकरराव चव्हाण सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमात उत्कृष्ट तहसीलदार म्हणून अभिजित जगताप यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

संबंधित सामग्री

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद. नांदेडमध्ये जीवित व वित्तहानी नाही.

Oct 03, 2026
नांदेडमध्ये प्रशासन अलर्ट! सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

नांदेडमध्ये प्रशासन अलर्ट! सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

नांदेड जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन २ ते ४ ऑक्टोबरच्या सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Oct 01, 2026
आता आश्वासन नको कृती करा; तरच उपोषणाची माघार

आता आश्वासन नको कृती करा; तरच उपोषणाची माघार

Mahur Amaran Uposhan: (नांदेड) धनोडा ते कोठारी राष्ट्रीय महामार्ग(क्र. १६१अ) शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे काम सन २०१९ पासून सुरू आहे. मात्र अद्याप या मार्गाचे कामे पूर्ण झाली नसल्याने ती कामे तातडीने

Sep 29, 2026
डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

लखमापूर येथे प्रतिबंधित डीजे वापरल्याप्रकरणी माहूर पोलिसांची कारवाई; पाच गणेश मंडळांच्या सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल, १.३७ कोटींचा मुद्देमाल जप्त.

Sep 26, 2026
दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांची सुनेत्रा पवारांसमोर व्यथा; कर्जमाफी आणि मदतीचे आश्वासन

दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांची सुनेत्रा पवारांसमोर व्यथा; कर्जमाफी आणि मदतीचे आश्वासन

नांदेडच्या सोनखेडमध्ये दुष्काळी पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्या. सुनेत्रा पवार यांनी पंचनामे, मदत, पाणी, चारा आणि कर्जमाफीबाबत आश्वासन दिले.

Sep 26, 2026