Nanded Drought

नांदेडमध्ये प्रशासन अलर्ट! सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

नांदेड जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन २ ते ४ ऑक्टोबरच्या सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नांदेडमध्ये प्रशासन अलर्ट! सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

Nanded Drought

मदत आणि उपाययोजनांच्या कामात खंड पडू नये यासाठी प्रशासन सतर्क

नांदेड जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. २ ते ४ ऑक्टोबरदरम्यान सरकारी सुट्ट्या असतानाही जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजासाठी उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता अधिकारी-कर्मचाऱ्यांनी रजा घेऊ नये, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयासह उपविभागीय अधिकारी आणि तहसील कार्यालयातील सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना या सूचनांचे पालन करावे लागणार आहे. सुट्टीच्या दिवसांमध्येही नियमित कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून दुष्काळसदृश्य परिस्थितीशी निगडित कामकाजाचा आढावा घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

दुष्काळी परिस्थितीचा परिणाम झालेल्या नागरिकांना आवश्यक सुविधा आणि शासकीय मदत वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मदतकार्य तसेच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या उपाययोजनांमध्ये कोणताही अडथळा किंवा खंड पडू नये, यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, यंदा पावसाने अपेक्षित साथ न दिल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. राज्यातील 250 पेक्षा जास्त तालुके दुष्काळसदृश्य परिस्थितीत असल्याचा जीआर सरकारकडून काढण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर विविध नेते शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

निसर्गाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने सणासुदीच्या काळातही बळीराजावर आर्थिक संकट ओढावले आहे. अशा परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणेकडून नागरिक आणि शेतकऱ्यांना मदत तातडीने मिळावी, यासाठी नांदेड जिल्ह्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुट्टी न घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

संबंधित सामग्री

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

Counterfeit Pesticide Market: देशातील कृषी क्षेत्रात बनावट कीटकनाशकांचा बाजार मोठ्या प्रमाणात विस्तारत असून, या बनावट उत्पादनांची उलाढाल तब्बल 11 हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याची धक्कादायक माहिती

Oct 05, 2026
MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026