भाजप जिल्हा बैठक

भाजपाची जिल्हा आढावा बैठक संपन्न;जून महिन्यात विविध अभियान

BJP district meeting: भाजपची हिंगोली जिल्हा बैठक संपली, जून महिन्यात लोककल्याण अभियानांची योजना ठरवली गेली. मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकालातील विकासमूलक योजना

भाजपाची जिल्हा आढावा बैठक संपन्न;जून महिन्यात विविध अभियान

BJP district meeting

हिंगोली (BJP district meeting) : केंद्रातील मोदी सरकारला बारा वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पार्टीच्या वतीने जून महिन्यात विविध लोककल्याणकारी आणि जनसंवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांच्या पूर्वतयारीसाठी आणि सूक्ष्म नियोजनासाठी हिंगोली जिल्हा भाजपाची महत्त्वपूर्ण बैठक शहरातील हॉटेल रामकृष्ण येथे संपन्न झाली. या बैठकीत जून महिनाभरात राबवल्या जाणाऱ्या विविध अभियानांची रूपरेषा ठरवून मंडलनिहाय जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले.

या (BJP district meeting) बैठकीला आमदार तान्हाजीराव मुटकुळे, जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे,माजी जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे,माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्यासह सुनिताताई मुळे,आतिश दांडेगावकर,जिल्हा उपाध्यक्ष मिलींद यंबल,महिला जिल्हाध्यक्ष उज्वलाताई तांभाळे,शिवाजीराव मुटकुळे,दिलीपराव देसाई,शिवदास बोड्डेवार,उमेश नागरे,विलास गोरे,अवधूत शिंदे, खोब्राजी नरवाडे,सतिश सोमाणी,रजनीश पुरोहीत,माणिक लोडे,कांतराव कोटकर,संजय ढोके,मंदाकिनी चव्हाण,डॉ.रवि पाटील गोरेगावकर,हमिद प्यारेवाले,कैलाश शहाणे,प्रशांत सोनी,पवन उपाध्ये,शिवा घुगे,डॉ.सुधाकर लोमटे,विठ्ठल भोयर,राहुल मेने,श्रिधर ठिकणे,ओमकार नावडे,गुलाब भोयर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या १२ वर्षांत घेतलेले ऐतिहासिक निर्णय, लोककल्याणकारी योजना आणि देशाचा झालेला अभूतपूर्व विकास सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जून महिनाभर हे अभियान चालवले जाणार आहे. या संदर्भात जिल्हा प्रभारी संजय कौडगे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले आणि प्रत्येक कार्यकर्त्यांने यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

Oct 06, 2026