BMW Crash

मुंबई कोस्टल रोडवर भीषण BMW अपघात; ५० फूट खाली कोसळलेल्या कारमध्ये ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुंबई कोस्टल रोडवर BMW ५० फूट खाली कोसळून ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू. गुजरातमधील चार तरुणांपैकी एक गंभीर जखमी असून नायर रुग्णालयात उपचार सुरू.

मुंबई कोस्टल रोडवर भीषण BMW अपघात; ५० फूट खाली कोसळलेल्या कारमध्ये ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

BMW Crash

गुजरातहून उच्च शिक्षणासाठी मुंबईत आले होते चार तरुण; एकाची प्रकृती चिंताजनक, नायर रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई : मुंबईतील कोस्टल रोडवर रविवारी पहाटे घडलेल्या भीषण अपघातात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. गुजरातमधून मुंबईत उच्च शिक्षणासाठी आलेल्या चार तरुणांची भरधाव BMW कार पुलाचा कठडा तोडून तब्बल ५० फूट खाली कोसळली. लाला कॉलेजसमोर आणि लोटस जेट्टीजवळ हा अपघात झाला. धडकेनंतर कारचा पूर्णपणे चुराडा झाला.

प्राथमिक माहितीनुसार, रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास ही BMW कार मरीन ड्राईव्हहून हाजी अलीच्या दिशेने जात होती. कोस्टल रोडवरील लाला कॉलेज आणि लोटस जेट्टी परिसरात कारचा वेग अधिक असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर कार पुलाच्या कठड्यावर आदळून तो तोडत थेट खाली कोसळली.

कार सिल्वासा पासिंगची; चारही तरुण अहमदाबादचे

अपघातग्रस्त BMW कार सिल्वासा, गुजरात पासिंगची असल्याचे तपासातून समोर आले आहे. कारमधील चारही तरुण अहमदाबादचे रहिवासी असून, ते मुंबईत उच्च शिक्षण घेण्यासाठी आले होते. मृत विद्यार्थ्यांपैकी एक आर्किटेक्चरचा, तर दुसरा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे.

तीन जणांचा मृत्यू, एकावर उपचार सुरू

अपघाताची माहिती मिळताच कोस्टल रोड कंट्रोल रूम आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. कारमधील जखमींना तातडीने नायर रुग्णालयात हलवण्यात आले.

नायर रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शानय गज्जल (वय २१), धिर्या सेठ (वय १७) आणि आणखी एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर चौथा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयातील ट्रॉमा वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.

कुटुंबीयांना माहिती; पोलिसांचा तपास सुरू

अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून मृत आणि जखमी विद्यार्थ्यांच्या गुजरातमधील कुटुंबीयांना दुर्घटनेची माहिती देण्यात आली आहे. प्राथमिक तपासात कार अतिवेगात असल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या अपघातामागील नेमकी परिस्थिती आणि इतर बाबींचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

मानोऱ्यात वैद्यकीय विद्यार्थ्याला बोलेरो पिकअपची धडक; तक्रार आणि CCTV पुरावा असूनही वाहन ताब्यात न घेतल्याचा आरोप.

Oct 03, 2026
पुण्यात स्कूल बसची दुचाकीला धडक; बहिणीच्या डोळ्यांसमोर १६ वर्षीय भावाचा मृत्यू

पुण्यात स्कूल बसची दुचाकीला धडक; बहिणीच्या डोळ्यांसमोर १६ वर्षीय भावाचा मृत्यू

पुण्यात स्कूल बसच्या धडकेत १६ वर्षीय रोहित कुदळेचा मृत्यू झाला. बहिण रिया गंभीर जखमी असून बसचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला.

Oct 01, 2026
ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Sep 30, 2026
आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम

आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम

आलेगाव येथील १३ वर्षीय आदिवासी मुलगी बेपत्ता असून, शोधासाठी वंचित बहुजन आघाडीने चान्नी ठाण्यात ठिय्या देत ७२ तासांचा अल्टिमेटम दिला.

Sep 29, 2026