Buffalo Price

परभणीत तब्बल ११ लाखांची म्हैस ठरतेय आकर्षणाचा केंद्रबिंदू; साडेपाच लाखांपर्यंत लागली बोली

परभणीत सध्या दुग्ध व्यवसायाशी संबंधित एक अनोखी चर्चा रंगली आहे.

परभणीत तब्बल ११ लाखांची म्हैस ठरतेय आकर्षणाचा केंद्रबिंदू; साडेपाच लाखांपर्यंत लागली बोली

परभणी : परभणीत सध्या दुग्ध व्यवसायाशी संबंधित एक अनोखी चर्चा रंगली आहे. खंडोबा बाजार परिसरात गुजरातहून आणण्यात आलेली तब्बल ११ लाख रुपये किंमत असलेली म्हैस पशुपालक आणि नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. या म्हशीला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असून, गुरुवार (दि. १६ जुलै) रोजी तिच्यासाठी साडेपाच लाख रुपयांपर्यंत बोली लागल्याची माहिती समोर आली आहे.

म्हैस व्यापारी शेख शोएब यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही म्हैस अत्यंत धिप्पाड असून तिची उंची सुमारे ७ फुटांपेक्षा अधिक आहे. तसेच तिची लांबीही लक्षणीय असून तिची शरीरयष्टी विशेष आकर्षण ठरत आहे.

व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही म्हैस दिवसाला तब्बल ३० लिटर दूध देण्याची क्षमता ठेवते. एका वेळेस सुमारे १५ लिटर दूध मिळते. तिची शरीरयष्टी इतकी मोठी आहे की वाहतुकीसाठी ४०७ सारख्या मोठ्या वाहनाची पूर्ण जागा व्यापावी लागते, असा दावा शेख शोएब यांनी केला आहे.

दुभत्या जनावरांना वाढती मागणी

दुग्ध व्यवसायात वाढलेली स्पर्धा तसेच शासनाने बनावट दुधाविरोधात घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे बाजारात दर्जेदार दुभत्या जनावरांना चांगला भाव मिळत आहे. सध्या दुधाला प्रतिलिटर १२० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याने शेतकरी आणि पशुपालकांचा कल उच्च दर्जाच्या म्हशी खरेदी करण्याकडे वाढला आहे.

पशुपालकांची मोठी गर्दी

सदर म्हैस पाहण्यासाठी आणि खरेदीसाठी परभणीसह जिल्ह्याबाहेरील पशुपालकही मोठ्या संख्येने येत आहेत. जरी म्हशीची किंमत ११ लाख रुपये सांगण्यात येत असली, तरी किमान ७ लाख रुपयांपर्यंत विक्री करण्याचा मानस असल्याचे म्हैस व्यापारी शेख शोएब यांनी व्यक्त केले.

संबंधित सामग्री

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026