किसान ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष ॲड. साहेबराव मोरे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी
मलकापूर/ बुलढाणा (Raising Solanke) : मलकापूर तालुक्यातील काटी येथे दरोडेखोरांशी झुंज देताना जीव गमावलेल्या रायसिंग सिताराम सोळंके (Raising Solanke) यांच्या कुटुंबाला शासनाने तातडीने १० लाख रुपयांचा सहाय्यता निधी द्यावा, अशी मागणी किसान ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष ॲड. साहेबराव एस. मोरे यांनी बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आवा पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
काटी गावात मागील काही काळापासून चोरी, दरोडे व घरफोडीच्या घटना वाढत असल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे २ वाजता रायसिंग सिताराम सोळंके हे घराला लागून असलेल्या गोठ्यात म्हैस जडत असल्याने तेथे बसले होते. त्यावेळी काही संशयित व्यक्ती आजूबाजूला फिरताना दिसल्याने त्यांनी त्यांना हटकले.
निवेदनानुसार, संशयितांनी रायसिंग यांच्यावर हल्ला केला. त्यापैकी दोघांनी त्यांच्या हातातील चाकूने पोटावर वार केले. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. गंभीर जखमी अवस्थेत रायसिंग यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
रायसिंग सोळंके (Raising Solanke) हे आदिवासी कुटुंबातील असून त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि वृद्ध आई असा परिवार आहे. कुटुंबाचा आधार असलेल्या रायसिंग यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे. निवेदनात रायसिंग यांनी दरोडेखोरांचा प्रतिकार करताना दाखवलेल्या धाडसाचाही प्रशांतचा करावी तेवढी कमी चार दरोडेखोरांच्या मजाक एकटाच रायसिंग त्याने चारी मधील एकाला काठी फेकून मारल्याने आणि दुसऱ्याला घरून ठेवल्यामुळे उरलेल्या दोन दरोडेखोर मधील एकाने रायसिंगच्या पोटात चाकू खूपस्ला असल्यावरही त्याने एकट्याने दरोडेखोराला झुंज दिली गावकऱ्यांना आरडाओरड करून माहिती देण्याच धाडस केले
कुटुंबाचा आधार गेला; शासनाने आधार द्यावा
दरोडेखोरांशी मुकाबला करताना रायसिंग (Raising Solanke) यांनी गावावरील संकट दूर करण्यासाठी प्रयत्न केला. मात्र या संघर्षात त्यांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे अशा परिस्थितीत शासनाने त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे आवश्यक असल्याचे ॲड. मोरे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
रायसिंग (Raising Solanke) यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर फार मोठे संकट कोसळले असून, त्यांच्या कुटुंबाला १० लाख रुपये सहाय्यता निधी देऊन त्यांच्या शौर्याचा सन्मान करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शासन या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे काटी ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.