शेगाव-बाळापूर रोडवर भीषण अपघात; लक्झरी बसने घेतला पेट, बस जळून खाक

शेगाव-बाळापूर रोडवर गुरुवारी भीषण अपघाताची घटना घडली.

शेगाव-बाळापूर रोडवर भीषण अपघात; लक्झरी बसने घेतला पेट, बस जळून खाक

Bus Fire Accident

बाळापूर (Bus Fire Accident) : शेगाव-बाळापूर रोडवर गुरुवारी भीषण अपघाताची घटना घडली. इंदौरहून अकोल्याकडे जाणारी स्वस्तिक ट्रॅव्हल्सची लक्झरी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातानंतर बसने अचानक पेट घेतल्याने काही वेळातच संपूर्ण बस जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वस्तिक ट्रॅव्हल्सची लक्झरी बस इंदौरवरून अकोल्याकडे जात असताना शेगाव-बाळापूर रोडवर एका दुचाकीस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित दुचाकी थेट बसखाली गेल्याने बसचे टायर फुटले. त्यानंतर दुचाकी बसखाली अडकल्यामुळे घर्षणातून आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण बसला वेढले. आग इतकी भीषण होती की काही वेळातच बस पूर्णपणे जळून खाक झाली. या अपघातात दुचाकी चालक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच बाळापूर नगर परिषदेकडील अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले.

दरम्यान, भररस्त्यात बस पेटल्याची घटना समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करत पुढील तपास सुरू केला आहे.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026