Cafe Flying Gypsy

पुण्यात रीलस्टारवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा; 19 वर्षीय तरुणावर कोयत्याने हल्ला, माधवी कुंभारसह 7 जण अटकेत

शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील गुन्हेगारी आता सोशल मीडिया आणि रीलच्या दुनियेशी संबंधित तरुणांपर्यंत पोहोचल्याचे या घटनेतून समोर आले आहे.

पुण्यात रीलस्टारवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा; 19 वर्षीय तरुणावर कोयत्याने हल्ला, माधवी कुंभारसह 7 जण अटकेत

Cafe Flying Gypsy

डेक्कन जिमखाना येथील कॅफे फ्लाईंग जिप्सीबाहेर हल्ला; साताऱ्यातील जुन्या वादातून पुण्यात नियोजनबद्ध हल्ला केल्याचा पोलिसांचा प्राथमिक तपास

पुणे : शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील गुन्हेगारी आता सोशल मीडिया आणि रीलच्या दुनियेशी संबंधित तरुणांपर्यंत पोहोचल्याचे या घटनेतून समोर आले आहे. डेक्कन जिमखाना परिसरातील ‘कॅफे फ्लाईंग जिप्सी’मध्ये 19 वर्षीय अथर्व प्रमोद जगताप याच्यावर कोयता आणि अन्य शस्त्रांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून प्रसिद्ध रील क्रिएटर माधवी कुंभारसह सात जणांना अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अथर्व प्रमोद जगताप (वय 19, रा. आंबेगाव) हा शनिवारी, 15 ऑगस्ट रोजी पहाटे सव्वातीनच्या सुमारास शिरोळे रोडवरील ‘कॅफे फ्लाईंग जिप्सी’मधून बाहेर पडत होता. त्याचवेळी आधीपासून दबा धरून बसलेल्या आरोपींच्या टोळक्याने त्याला अडवले. ‘तू पोरींना काय बोलला, आमच्यासोबत चल, तुला दाखवितो’, असे म्हणत आरोपींनी त्याला धमकावले आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

परिस्थिती लक्षात येताच अथर्वने स्वतःचा बचाव करण्यासाठी पुन्हा कॅफेमध्ये धाव घेतली. मात्र आरोपींनी त्याचा पाठलाग करत हॉटेलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ‘याला जिवंत सोडू नका’ असे म्हणत त्याच्या डोक्यावर शस्त्राने वार करण्यात आले. आरोपींनी हॉटेलमधील खुर्च्याही त्याच्यावर फेकल्या. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले.

साताऱ्यातील जुन्या वादातून पुण्यात हल्ला?

पोलिस तपासात या हल्ल्यामागे साताऱ्यातील जुना वाद असल्याची माहिती समोर आली आहे. अथर्व जगताप आणि आरोपी तरुणी एकमेकांच्या परिचयाचे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. काही महिन्यांपूर्वी साताऱ्यातील कास पठार येथे स्टंटबाजी करताना कारला कट मारण्याच्या कारणावरून दोन्ही गटांमध्ये वाद झाला होता.

याच घटनेचा राग मनात असल्याचा संशय असून, त्यातूनच आरोपींनी पुण्यात अथर्ववर हल्ला करण्याचे नियोजन केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे हा हल्ला पूर्वनियोजित होता का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.

माधवी कुंभारसह सात जणांना अटक

हल्ल्यानंतर जखमी अवस्थेतील अथर्वने डेक्कन पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. संबंधित हॉटेल आणि परिसरात यापूर्वीही गोंधळ व मारहाणीच्या घटना घडत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे सांगण्यात आले.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन डेक्कन पोलिसांनी कारवाई करत प्रसिद्ध रीलस्टार माधवी कुंभार (रा. काळेपडळ, हडपसर), स्नेहल सोनके (रा. पिंपळे गुरव) आणि शार्दुल ओव्हाळ (रा. हडपसर) यांच्यासह एकूण सात जणांना अटक केली आहे.

दरम्यान, या आरोपींसोबत असलेल्या आणखी 7 ते 8 अज्ञात साथीदारांविरोधातही डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासह हल्ल्यामागील नेमका घटनाक्रम आणि जुन्या वादाची पार्श्वभूमी याबाबत पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

सोशल मीडिया, रील्स आणि त्यातून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात घडलेल्या या गंभीर हल्ल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

संबंधित सामग्री

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
केतन अग्रवाल प्रकरणात मोठा डिजिटल पुरावा; 1,801 चॅट्सचा डेटा रिकव्हर, लोहगडवरील फोटोंमधून कटाचा तपास पुढे

केतन अग्रवाल प्रकरणात मोठा डिजिटल पुरावा; 1,801 चॅट्सचा डेटा रिकव्हर, लोहगडवरील फोटोंमधून कटाचा तपास पुढे

केतन अग्रवाल प्रकरणात 1,801 चॅट्सचा डेटा, 11 डिलीट WhatsApp चॅट्स आणि लोहगडवरील फोटोंचा तपास; 5,053 पानी आरोपपत्रात डिजिटल पुरावे.

Oct 03, 2026
“पुराव्याशिवाय माझ्यावर आरोप”; पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा

“पुराव्याशिवाय माझ्यावर आरोप”; पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा ठाकरे-राऊतांवर पलटवार; पुराव्याशिवाय आरोप होत असल्याचा दावा करत दिशा सालियन प्रकरणावरही सवाल.

Oct 02, 2026
निलेश घायवळसह सर्व आरोपींची खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्तता; पुराव्याअभावी मोक्का न्यायालयाचा निर्णय

निलेश घायवळसह सर्व आरोपींची खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्तता; पुराव्याअभावी मोक्का न्यायालयाचा निर्णय

२०२०च्या खंडणी प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपींची मोक्का कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. फिर्यादी आणि साक्षीदारांनी आरोप नाकारले.

Sep 29, 2026