विद्यार्थी जलसमाधी आंदोलन

चंद्रपुरात इरईनदी पात्रात उतरून ‘आंदोलन'; राहुल गांधींच्या अटकेचा निषेध

Student Jalsamadhi Protest:

चंद्रपुरात इरईनदी पात्रात उतरून ‘आंदोलन'; राहुल गांधींच्या अटकेचा निषेध

Student Jalsamadhi Protest

चंद्रपूर (Student Jalsamadhi Protest) : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ चंद्रपूरातील विद्यार्थ्यांनी बुधवारी इरई नदीच्या पात्रात उतरून अर्धनग्न अवस्थेत ‘जलसमाधी’ आंदोलन करत केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र निषेध नोंदविला. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कथित अटकेचा निषेध करण्यात आला, तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

या (Student Jalsamadhi Protest) आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी इरई नदीच्या पात्रात उभे राहून केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शिक्षणाचे वाढते खाजगीकरण, युवकांवरील अन्याय, बेरोजगारी आणि शिक्षण क्षेत्रातील धोरणांविरोधात त्यांनी संताप व्यक्त केला. तसेच पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनालाही विद्यार्थ्यांनी पाठिंबा जाहीर केला. आंदोलकांनी, "विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून दडपशाहीचे राजकारण केले जात आहे. कितीही दबाव आणला, आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला किंवा अन्याय केला, तरी आम्ही मागे हटणार नाही," असा निर्धार व्यक्त केला. 

या (Student Jalsamadhi Protest) आंदोलनामुळे काही काळ इरई नदी परिसरात उत्सुक नागरिकांची गर्दी झाली होती. आंदोलन शांततेत पार पडले असून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरात करण्यात आलेल्या या प्रतीकात्मक ‘जलसमाधी’ आंदोलनाची शहरातील राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात दिवसभर चर्चा रंगली. विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणीही यावेळी केली. वरोरा शहरात माजी नगराध्यक्ष तथा वरोरा काँग्रेस अध्यक्ष विलास टिपले, प्रवीण काकडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

नीट परीक्षेतील गैरव्यवस्थापनाची निष्पक्ष चौकशी करावी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या प्रमुख मागण्यांकरिता बुधवारला वरोरा शहरात भर पावसात वरोरा शहरातील विद्यार्थी, सामाजिक, व्यापारी व राजकीय संघटनेच्या वतीने लक्षवेधी निदर्शने आंदोलन करण्यात आले.विद्यार्थी, पालकही या आंदोलनात मोठ्या संख्येत सहभागी झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली. शहीद योगेश डाहुले स्मारक परिसरात नीट परीक्षेच्या आत्महत्या केलेल्या २२ विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत नायब तहसीलदार मसराम यांनी निवेदन स्वीकारले.

जाहीर निषेध
चंद्रपूर शहरात गांधी चौकात काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष रितेश तिवारी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. नीट परिक्षेतील गोंधळ, पेपर फुट प्रकरण, विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला याचा निषेध करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचाही जाहीर निषेध नोंदविण्यात आला. यावेळी विद्यार्थी व काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.

संबंधित सामग्री

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाशी संबंधित 13 FIR रद्द

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाशी संबंधित 13 FIR रद्द

NEET प्रश्नपत्रिका फुटीच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनाशी संबंधित कॉक्रोच जनता पार्टीच्या 13 एफआयआरवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महत्त्वाचा निर्णय दिला.

Sep 01, 2026
'खाऊन-पिऊन आंदोलन करा, मी चोरून खायचो आणि आंदोलन करायचो'आदिवासी विद्यार्थ्यांना नरहरी झिरवळ  यांचा अजब सल्ला

'खाऊन-पिऊन आंदोलन करा, मी चोरून खायचो आणि आंदोलन करायचो'आदिवासी विद्यार्थ्यांना नरहरी झिरवळ यांचा अजब सल्ला

पुण्यातील मांजरी परिसरात आदिवासी विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेले आंदोलन आणि उपोषण १४व्या दिवशीही कायम आहे.

Aug 27, 2026
पेलेट गन प्रकरणावर राहुल गांधी आक्रमक; दिल्ली पोलिसांच्या DCP कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन

पेलेट गन प्रकरणावर राहुल गांधी आक्रमक; दिल्ली पोलिसांच्या DCP कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन

जंतर मंतर येथील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पेलेट गनच्या वापराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Aug 21, 2026