ऑनलाइन औषध विक्रीविरोधात मलकापुरातील औषध विक्रेत्यांचा बंद

शहरातील केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या नेतृत्वाखाली सर्व औषध दुकाने कडकडीत बंद ठेवून आंदोलन करण्यात आले.

ऑनलाइन औषध विक्रीविरोधात मलकापुरातील औषध विक्रेत्यांचा बंद

Chemist Protest

देशव्यापी आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; तहसीलदारांना निवेदन

मलकापूर (Chemist Protest) : अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या वतीने ऑनलाइन औषध विक्री तसेच कॉर्पोरेट कंपन्यांकडून वाढत असलेल्या व्यावसायिक स्पर्धेविरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदला मलकापूर शहरातील औषध विक्रेत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या नेतृत्वाखाली सर्व औषध दुकाने कडकडीत बंद ठेवून आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांसंदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

औषध विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, औषध विक्री व्यवसाय हा ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट १९४० व १९४५ अंतर्गत नियंत्रित केला जातो. मात्र या कायद्यात ऑनलाइन औषध विक्रीसंदर्भात कोणतीही स्पष्ट तरतूद नसतानाही देशभरात मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन माध्यमातून औषधांची विक्री सुरू असल्याचा आरोप करण्यात आला.

कोरोना काळात औषधांची होम डिलिव्हरी करण्यासाठी विशेष सवलत देण्यात आली होती. मात्र ती सवलत अद्याप रद्द करण्यात आलेली नसल्याने ऑनलाइन कंपन्या त्याचा फायदा घेत असल्याचे औषध विक्रेत्यांनी निवेदनात म्हटले आहे.

ऑनलाइन औषध विक्रीमुळे स्थानिक किरकोळ व घाऊक औषध विक्रेत्यांवर आर्थिक संकट ओढवले असून पारंपरिक व्यवसाय धोक्यात आल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे ऑनलाइन औषध विक्री प्रणालीवर निर्बंध आणून स्थानिक औषध विक्रेत्यांचे संरक्षण करण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

या आंदोलनात केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष गोपाल मालपाणी, उपाध्यक्ष खालीद अमन, सचिव नीरज चवरे, ज्येष्ठ सदस्य जयचंद पारख यांच्यासह शहरातील रिटेल व होलसेल औषध विक्रेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026