पेट्रोल पंपाशेजारील भंगार दुकानाला भीषण आग; लाखोंचे नुकसान

चिखली शहरातील गजबजलेल्या बॉम्बे मार्केट परिसरात आज सकाळी भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली.

पेट्रोल पंपाशेजारील भंगार दुकानाला भीषण आग; लाखोंचे नुकसान

Chikhli Fire

स्थानिकांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली

चिखली (Chikhli Fire) : चिखली शहरातील गजबजलेल्या बॉम्बे मार्केट परिसरात आज सकाळी भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. बॉन्द्रे पेट्रोल पंपाच्या शेजारी असलेल्या जहीर खान कुरेशी यांच्या भंगार दुकानाला अचानक आग लागल्याने परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

आग इतकी भीषण होती की काही वेळातच दुकानातील मोठ्या प्रमाणातील भंगार साहित्य जळून खाक झाले. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, पेट्रोल पंपाच्या अगदी शेजारीच आग लागल्यामुळे काही काळ मोठा अनर्थ घडण्याची भीती निर्माण झाली होती. आग वाढत असल्याचे पाहून परिसरातील नागरिक, व्यापारी आणि वाहनधारकांमध्ये घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

स्थानिक नागरिक, व्यापारी आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित विभागाकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे बॉम्बे मार्केट परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

संबंधित सामग्री

रिसोड पंचायत समितीच्या रेकॉर्ड रूमला भीषण आग; कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

रिसोड पंचायत समितीच्या रेकॉर्ड रूमला भीषण आग; कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

 रिसोड येथील पंचायत समितीच्या अभिलेख कक्षाला (रेकॉर्ड रूम) १५ मे रोजी रात्री सुमारे ८:१५ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली.

May 16, 2026
खंडाळा (मकरध्वज) येथे भीषण आग; ६ लाखांचे नुकसान, जीवितहानी टळली

खंडाळा (मकरध्वज) येथे भीषण आग; ६ लाखांचे नुकसान, जीवितहानी टळली

चिखली तालुक्यातील खंडाळा (मकरध्वज) येथे शुक्रवारी सकाळी सुमारे ९:३० वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत एका घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Apr 24, 2026
ठाणे येथे शिवशाही बसला भीषण आग; CETIS ब्रिज परिसरात खळबळ; १५ प्रवासी सुखरूप

ठाणे येथे शिवशाही बसला भीषण आग; CETIS ब्रिज परिसरात खळबळ; १५ प्रवासी सुखरूप

ठाणे रेल्वे स्थानकाजवळील सेटीस (CETIS) ब्रिज परिसरात आज दुपारच्या सुमारास शिवशाही बसला भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली.

Apr 23, 2026