देऊळगावराजा शहरातील मध्यवर्ती भागात भीषण आग; मेन रोडवरील पाच दुकाने जळून खाक

देऊळगावराजा शहरातील मध्यवर्ती भागात भीषण आग; मेन रोडवरील पाच दुकाने जळून खाक

Fire Accident

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज – अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी आग आटोक्यात, व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान

देऊळगाव राजा (Fire Accident) : बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा शहरात आज दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. शहराच्या मध्यवर्ती भागातील मेन रोडवरील सलग पाच दुकानांना अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

आग इतकी भीषण होती की काही क्षणातच आगीचे मोठमोठे लोळ उसळले आणि मुख्य मार्गावर भीतीचे वातावरण निर्माण झाले. या आगीत किराणा दुकान, रेडिमेड कपड्यांचे दुकान, आईस्क्रीम पार्लर तसेच इतर दोन दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली.

प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच देऊळगाव राजा नगर परिषद अग्निशमन विभागच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत काही वेळातच आग आटोक्यात आणली.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती आणि काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026