CJP Protest

CJP आंदोलनात तुकाराम मुंढेंचे पोस्टर; मुख्य निवडणूक आयुक्त करण्याची मागणी

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJPचे शिवाजी पार्कात आंदोलन; तुकाराम मुंढेंना मुख्य निवडणूक आयुक्त करण्याची मागणी, तरुणांचा मोठा सहभाग.

CJP आंदोलनात तुकाराम मुंढेंचे पोस्टर; मुख्य निवडणूक आयुक्त करण्याची मागणी

CJP Protest

मिमिक्री आणि घोषणांनी आंदोलनस्थळी वातावरण तापले

मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात शुक्रवारी, २ ऑक्टोबर रोजी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJPकडून आंदोलन करण्यात आले. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाल्याचे दिसून आले. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी हे या आंदोलनाचे प्रमुख कारण असल्याचे सीजेपीने जाहीर केले होते. TV9 Marathi

आंदोलनस्थळी सहभागी तरुणांच्या हातात तिरंगा पाहायला मिळाला. निवडणूक आयोगाच्या विरोधात घोषणाबाजी करत लोकशाहीच्या मुद्द्यावर आवाज उठवण्याचे आवाहन करण्यात आले. देशभक्तीपर गाण्यांच्या माध्यमातूनही आंदोलनकर्त्यांनी वातावरण निर्मिती केली. या आंदोलनात तरुणांसोबत काही ज्येष्ठ नागरिकांनीही सहभाग घेतल्याचे दिसून आले.

दरम्यान, आंदोलनादरम्यान अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांचे पोस्टरही झळकले. काही नागरिकांनी हे पोस्टर हातात घेत तुकाराम मुंढे यांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करावी, अशी मागणी केली. गेल्या काही दिवसांत भेसळविरोधातील FDAच्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर मुंढे यांच्या कामाचा दाखला देत ही मागणी करण्यात आली.

आंदोलनकर्त्यांकडून असा दावा करण्यात आला की, नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित भेसळीविरोधात ज्याप्रमाणे कारवाई केली जात आहे, त्याचप्रमाणे निवडणूक आयोगातही कठोर आणि प्रभावी कामकाजाची आवश्यकता आहे. त्यामुळे तुकाराम मुंढे यांना मुख्य निवडणूक आयुक्त करण्याची मागणी आंदोलनस्थळी करण्यात आली.

मोदींची मिमिक्री करत ज्ञानेश कुमारांवर उपरोधिक भाष्य

शिवाजी पार्कातील आंदोलनादरम्यान एका तरुणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची मिमिक्री केली. ‘मोदीजी माफ करा, मी तुमचं काम करू शकत नाही,’ अशा शब्दांत त्याने ज्ञानेश कुमार यांच्यावर उपरोधिक भाष्य केले. या मिमिक्रीचा व्हिडीओ आंदोलनस्थळी चर्चेचा विषय ठरला.

‘उठाबशा काढण्याची वेळ येईल’, आंदोलकाची प्रतिक्रिया

ज्ञानेश कुमार यांच्या राजीन्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाबाबत एका तरुण आंदोलकाने आक्रमक प्रतिक्रिया दिली. या आंदोलनामुळे ज्ञानेश कुमार यांच्यावर उठाबशा काढण्याची वेळ येईल, असे मत त्याने व्यक्त केले.

६५ वर्षीय आंदोलकाचाही सहभाग

शिवाजी पार्कातील आंदोलनात ६५ वर्षीय व्यक्तीनेही सहभाग घेतला. मुंबईकरांना जागे करण्यासाठी आपण टाळ वाजवत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आंदोलनात तरुणांसोबत ज्येष्ठ नागरिकांचाही सहभाग असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी २ ऑक्टोबरला मुंबईतील शिवाजी पार्क येथे आंदोलन करण्याची घोषणा सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी केली होती. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्याचेही यापूर्वी वृत्त आले होते.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
‘सुधारित Form 6 ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नाही’; CJI सूर्यकांतांचे मोठे स्पष्टीकरण

‘सुधारित Form 6 ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नाही’; CJI सूर्यकांतांचे मोठे स्पष्टीकरण

सुधारित Form 6ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नसल्याचे CJI सूर्यकांत यांनी स्पष्ट केले. SIRच्या १४ निर्णयांवर याचिकेत सवाल; निवडणूक आयोगाला नोटीस.

Oct 05, 2026
IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026
SIRच्या १४ निर्णयांवरून ज्ञानेश कुमार अडचणीत? सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

SIRच्या १४ निर्णयांवरून ज्ञानेश कुमार अडचणीत? सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

CEC ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाच्या मागणीवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने अंतरिम आदेशास नकार देत निवडणूक आयोग आणि केंद्राला नोटीस बजावली.

Oct 05, 2026
जंतर-मंतर आंदोलनात 3 महिला पत्रकारांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी; क्राइम ब्रांच करणार चौकशी

जंतर-मंतर आंदोलनात 3 महिला पत्रकारांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी; क्राइम ब्रांच करणार चौकशी

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनादरम्यान तीन महिला पत्रकारांनी लैंगिक छळाच्या तक्रारी केल्या. दिल्ली पोलिसांनी प्रकरण क्राइम ब्रांचकडे सोपवले.

Oct 04, 2026