हिंगणघाटची सेजल जेसवानी वाणिज्य शाखेत जिल्ह्यात अव्वल

बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला असून, हिंगणघाट येथील सेजल सुनील जेसवानी हिने वाणिज्य शाखेत 96.35 टक्के गुण मिळवले.

हिंगणघाटची सेजल जेसवानी वाणिज्य शाखेत जिल्ह्यात अव्वल

Commerce Topper

96.35% गुणांसह सेजल जेसवानी वाणिज्य शाखेत पहिली

हिंगणघाट (Commerce Topper) : बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला असून, हिंगणघाट येथील सेजल सुनील जेसवानी हिने वाणिज्य शाखेत 96.35 टक्के गुण मिळवत वर्धा जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे हिंगणघाट शहराचा गौरव वाढला आहे.

सेजल ही येथील होली फेथ ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी असून जेसवानी कुटुंबातील तीन मुलींमध्ये सर्वात लहान आहे. तिचे वडील सुनील जेसवानी हे हार्डवेअर व्यवसायिक असून आई ज्योती जेसवानी या गृहिणी आहेत. मोठी बहीण मेघा ही सीए अभ्यासक्रम करत आहे, तर यशस्विनी ही बीडीएसच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे.
सेजलने एकूण 600 पैकी 578 गुण मिळवले आहेत. विषयानुसार तिचे गुण पुढीलप्रमाणे – मॅथ्स व स्टॅटिस्टिक्स 99, ओसीएम 97, इकॉनॉमिक्स 97, बुक-कीपिंग व अकाउंटन्सी 97, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 96.

दररोज सुमारे चार तास अभ्यास करून सेजलने हे यश संपादन केले. तिच्या यशामागे आई ज्योती तसेच बहिणी मेघा व यशस्विनी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. याशिवाय कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या बिना मॅडम आणि अमित दीक्षित सर यांचेही तिला मार्गदर्शन मिळाले. भविष्यात सीएमए (कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट) हा अभ्यासक्रम करण्याचा तिचा मानस असून पुढील शिक्षणासाठी ती मुंबई येथे जाणार असल्याचे तिने सांगितले. पेंटिंग, ड्रॉइंग आणि जिम यामध्येही तिला विशेष आवड आहे. दहावीमध्ये 90.80% गुण मिळवलेल्या सेजलने बारावीत आणखी उज्वल यश संपादन करत वाणिज्य शाखेत जिल्ह्यात अव्वल स्थान मिळवले आहे.

संबंधित सामग्री

दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षा शुल्क माफ

दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षा शुल्क माफ

महाराष्ट्रातील २६५ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षेसाठी शुल्क माफी देण्यात आली आहे.

Sep 30, 2026
कनिष्ठ महाविद्यालयीन संचमान्यतेच्या अडचणींवर सहविचार सभा; तांत्रिक त्रुटी दोन-तीन दिवसांत दूर करण्याचे आश्वासन

कनिष्ठ महाविद्यालयीन संचमान्यतेच्या अडचणींवर सहविचार सभा; तांत्रिक त्रुटी दोन-तीन दिवसांत दूर करण्याचे आश्वासन

कनिष्ठ महाविद्यालयीन संचमान्यतेच्या अडचणींवर महासंघाची बैठक झाली. UDISE+ मधील तांत्रिक त्रुटी दोन-तीन दिवसांत दूर करण्याचे आश्वासन मिळाले.

Sep 29, 2026
दहावीनंतर पॉलिटेक्निकचा मार्ग; CET-JEE च्या स्पर्धेऐवजी विद्यार्थ्यांची पदविकेला पसंती

दहावीनंतर पॉलिटेक्निकचा मार्ग; CET-JEE च्या स्पर्धेऐवजी विद्यार्थ्यांची पदविकेला पसंती

Polytechnic Engineering Admission: दहावीनंतर बारावी आणि अभियांत्रिकी पदवीला प्रवेश घेण्याऐवजी पॉलिटेक्निकमधून पदविका करून अभियांत्रिकीच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल

Sep 29, 2026
शिक्षक नियुक्तीवरून मिसाळवाडीत वाद चिघळला; शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप

शिक्षक नियुक्तीवरून मिसाळवाडीत वाद चिघळला; शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप

मिसाळवाडी शाळेतील शिक्षक नियुक्तीवरून वाद चिघळला. ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले असून, प्रशासनाने निर्णय न बदलल्यास मंगळवारी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Sep 19, 2026
SET परीक्षा पुन्हा लांबणीवर; आता २५ ऑक्टोबरला परीक्षा, तिसऱ्यांदा वेळापत्रकात बदल

SET परीक्षा पुन्हा लांबणीवर; आता २५ ऑक्टोबरला परीक्षा, तिसऱ्यांदा वेळापत्रकात बदल

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ४१ वी SET परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आता परीक्षा २५ ऑक्टोबरला होणार असून वेळापत्रकात तिसऱ्यांदा बदल झाला आहे.

Sep 15, 2026