Exam Fee Waiver

दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षा शुल्क माफ

महाराष्ट्रातील २६५ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षेसाठी शुल्क माफी देण्यात आली आहे.

दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षा शुल्क माफ

Exam Fee Waiver

राज्यातील २६५ दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी विशेष सवलत; पुढील आदेशापर्यंत शुल्क न घेता परीक्षा अर्ज स्वीकारण्याचे आदेश

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये शिक्षण घेणाऱ्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला आहे.

राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर विशेष बाब म्हणून विविध उपाययोजना आणि सवलती लागू करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या तालुक्यांमधील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कातून सूट देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून पुढील आदेश मिळेपर्यंत शुल्क न आकारता परीक्षा अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया राबवावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही राज्य मंडळाने दिल्या आहेत. दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील सर्व माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना याबाबत त्वरित माहिती देऊन आवश्यक कार्यवाही करावी. तसेच करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य मंडळाकडे तातडीने सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दुष्काळाच्या परिस्थितीचा आर्थिक फटका विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना बसू नये आणि दहावी-बारावीच्या परीक्षा प्रक्रियेत त्यांना अडचणी येऊ नयेत, यासाठी ही सवलत देण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत संबंधित विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल केले जाणार नाही.

संबंधित सामग्री

बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचा मृत्यू; ‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली, तरी कर्ज फिटलं नाही’

बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचा मृत्यू; ‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली, तरी कर्ज फिटलं नाही’

बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यात कर्जबाजारीपणामुळे शंकर भारसाकळे यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत त्यांनी कर्ज आणि आर्थिक संकटाचा उल्लेख केल्याचे समोर आले.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026
दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव रद्द. महोत्सवाचा खर्च दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केला जाणार.

Oct 03, 2026
मराठवाड्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली; धरणांमध्ये फक्त 43.66% पाणीसाठा, अनेक प्रकल्प आटण्याच्या मार्गावर

मराठवाड्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली; धरणांमध्ये फक्त 43.66% पाणीसाठा, अनेक प्रकल्प आटण्याच्या मार्गावर

मराठवाड्यातील धरणांमध्ये फक्त 43.66% पाणीसाठा शिल्लक. सिद्धेश्वर, सीना-कोळेगाव शून्यावर; जायकवाडी 77.08% तर मांजरा 10% वर.

Oct 02, 2026
 दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक विभागाची ‘वृक्ष लागवड व संगोपन’ योजना बंद; काय आहे कारण?

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक विभागाची ‘वृक्ष लागवड व संगोपन’ योजना बंद; काय आहे कारण?

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने अल्पसंख्याक विभागाची ‘वृक्ष लागवड व संगोपन’ योजना बंद करण्याचा निर्णय घेतला.

Oct 02, 2026