प्रशासनाचा आंधळेपणा की, कंत्राटदाराशी संगनमत !

 नगरपरिषद सावनेर प्रशासनाकडून जनतेच्या सोयीसाठी सार्वजनिक शौचालयांची कामे हाती घेण्यात आली आहेत.

प्रशासनाचा आंधळेपणा की, कंत्राटदाराशी संगनमत !

Construction Scam

लोखंडी सेंट्रिंगऐवजी सिमेंटच्या पोत्यात भरले कॉलम सावनेर नगरपरिषदेचा सावळागोंधळ

सावनेर (Construction Scam) : नगरपरिषद सावनेर प्रशासनाकडून जनतेच्या सोयीसाठी सार्वजनिक शौचालयांची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, या कामांमध्ये कंत्राटदारांकडून मोठ्या प्रमाणावर हलगर्जीपणा आणि निकृष्ट साहित्याचा वापर होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. चक्क सिमेंटच्या पोत्यांचा वापर करून कॉलमचे (स्तंभ) काँक्रिटीकरण करण्यात येत असल्याने इमारतीच्या मजबुतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. परंतु प्रशासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. तेव्हा हा प्रशासनाचा आंधळेपण की, कंत्राटदाराशी संगनमत !अशा चर्चा सध्या शहरात सुरू आहे.

कोणत्याही आरसीसी बांधकामात कॉलम भरताना लोखंडी किंवा लाकडी सेंट्रिंग (फरमा) वापरणे अनिवार्य असते. यामुळे कॉलमला योग्य आकार मिळतो आणि काँक्रिटमधील पाणी शोषले जात नाही, ज्यामुळे कॉलम मजबूत होतो.

मात्र, सावनेर येथील कामात कंत्राटदाराने खर्च वाचवण्यासाठी चक्क सिमेंटच्या रिकाम्या पोत्यांचा (बोरी) वापर करून कॉलम भरल्याचे दिसून येत आहे. पोत्यांमुळे काँक्रिटमधील ओलावा योग्यरितीने टिकून राहत नाही, ज्यामुळे कॉलम ठिसूळ होतो. भविष्यात हे निकृष्ट स्तंभ कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जनतेच्या करातून उभारल्या जाणाऱ्या या सोयीसुविधा कंत्राटदाराच्या नफेखोरीमुळे अल्पावधीतच खराब होण्याची भीती आहे.

प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

एकीकडे सरकार दर्जेदार बांधकामाचे दावे करत असताना, स्थानिक नगरपरिषद, संबंधित अभियंता आणि प्रशासन या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष कसे करत आहेत, असा सवाल नागरिक विचारत आहेत. या कामाची तातडीने चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी आणि हे निकृष्ट बांधकाम पाडून पुन्हा नियमानुसार दर्जेदार काम करावे, अशी मागणी सावनेरवासीयांकडून होत आहे.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026