कोरपना अन्नपुरवठा निरीक्षण

कोरपना अन्नपुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याची सहकाऱ्याला मारहाण

Korpana Food Supply Inspection: अन्नपुरवठा निरीक्षण अधिकारी यांनी आपल्या सहकारी पुरवठा निरीक्षकाच्या कानशिलात मारल्याचा आरोप समोर आला असून, याच्या गैरवर्तनाने संताप व्यक्त केला जात आहे

कोरपना अन्नपुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याची सहकाऱ्याला मारहाण

Korpana Food Supply Inspection

 

तहसील कार्यालयात अधिकाऱ्याची गुंडगिरी, कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट

कोरपना (Korpana Food Supply Inspection) : येथील अन्नपुरवठा विभागात गुरुवारी सायंकाळी घडलेल्या एका कथित घटनेने संपूर्ण तहसील कार्यालयात खळबळ उडाली आहे. अन्नपुरवठा निरीक्षण अधिकारी यांनी आपल्या सहकारी पुरवठा निरीक्षकाच्या कानशिलात मारल्याचा आरोप समोर आला असून, याच्या गैरवर्तनाने संताप व्यक्त केला जात आहे जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून कारवाई करण्याची गरज आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महसूल विभागाच्या महाराजस्व अभियानाची जोरदार तयारी सुरू होती. पुरवठा सहाय्यक निरीक्षक हे शासकीय कामानिमित्त चंद्रपूर येथे गेले होते. भुकेने व्याकुळ झाल्याने सायंकाळी परतल्यानंतर ते कार्यालयातून घरी जायच्या तयारीत होते. तोच पुरवठा निरीक्षन अधिकारी यांचा फोन येतो लगेच कार्यक्रम स्थळी या यावेळी ते सहकारी सहायक निरीक्षक बोलले मी घरी जाऊन जेवण करून लगेच येतो, असे  दूरध्वनीवर सांगितल्याचे समजते. मात्र, या उत्तरामुळे संतप्त झालेल्या पुरवठा निरीक्षण अधिकारी यांनी कार्यालय गाठत कोणतीही चर्चा न करता त्यांना मारहाण केल्याचे कळते. या घटनेमुळे कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी काही काळ स्तब्ध झाले. उपविभागीय अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती शांत केल्याची माहिती समोर येत आहे.

या (Korpana Food Supply Inspection) अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीवर यापूर्वीही अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असल्याची चर्चा आहे. नागरिकांशी उद्धट वर्तन, रास्त भाव दुकानदारांना विनाकारण त्रास, तसेच काही प्रकरणांमध्ये पक्षपाती भूमिका, एवढेच नाही तर अंगणवाडी सेविकांच्या रेशनकार्ड प्रकरणापासून ते स्थानिक लोकप्रतिनिधींशी झालेल्या वादांपर्यंत त्यांचे नाव अनेकदा चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या एका स्थानिक नगरसेवका सोबत झालेला वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचल्याचीही माहिती आहे. तरही स्वतःला प्रामाणिक दाखवत असलेले काहींची कामे मात्र 'टेबलाखालून' होत असल्याचे नागरिकांचा चर्चेतून कळते.

आता स्वतःच्या सहकारी अधिकाऱ्यावर हात उचलल्याचा आरोप समोर आल्याने प्रशासनातील शिस्त आणि अधिकाऱ्यांच्या वर्तनावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सरकारी कार्यालयात सहकाऱ्याशी अशा प्रकारचे गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करून प्रशासन कठोर कारवाई करणार का? की हे प्रकरणही दडपले जाणार? याकडे संपूर्ण कोरपना तालुक्याचे लक्ष लागले आहे.

सीसीटीव्हीमुळे प्रकरणाची सत्यता बाहेर येणार

मारहाणी नंतर या प्रकरणाची रीतसर तक्रार करण्यात आलेली नाही उपविभागीय अधिकाऱ्यांनी समज दिल्याची माहिती आहे सहकारी कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याने इतर महसुली कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे तहसील कार्यालयात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहे सीसीटीव्ही तपासल्यास या प्रकरणाची सत्यता समोर आणून महसूल प्रशासन मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतील असा प्रश्न नागरिकांना पडला आहे

संबंधित सामग्री

'मंत्री-प्रशासनाची मुले बाकावर, आमची मुले जमिनीवर का?'

'मंत्री-प्रशासनाची मुले बाकावर, आमची मुले जमिनीवर का?'

CJP Abhijit Deepke: जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरावस्था पाहून संताप व्यक्त करत कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी शासन- प्रशासनाला थेट इशारा दिला आहे.

Aug 19, 2026
&quotमंत्री-प्रशासनाची मुले बाकावर, आमची मुले जमिनीवर का?&quot

&quotमंत्री-प्रशासनाची मुले बाकावर, आमची मुले जमिनीवर का?&quot

CJP Abhijit Deepke: जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरावस्था पाहून संताप व्यक्त करत कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी शासन- प्रशासनाला थेट इशारा दिला आहे.

Aug 19, 2026
पालकमंत्री जिल्ह्यात असतानाही प्रशासन बेपत्ता; अखेर तुर्तास आत्मदहन आंदोलन मागे!

पालकमंत्री जिल्ह्यात असतानाही प्रशासन बेपत्ता; अखेर तुर्तास आत्मदहन आंदोलन मागे!

Manora Immolation Protest: तालुक्यातील मौजे भुली येथील शेकडो नागरिक सन २०२३ पासून अतिवृष्टी अनुदानापासून वंचित आहेत , पात्र कुटुंबांना न्याय मिळावा आणि दोषीविरुद्ध कार्यवाही करावी,

Aug 16, 2026
भर्रीटोला-नवरगाव मार्गावरील पूलवजा बंधारा वाहून गेला; जलसंधारण विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

भर्रीटोला-नवरगाव मार्गावरील पूलवजा बंधारा वाहून गेला; जलसंधारण विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम कोरची तालुक्यातील नवरगाव ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या भर्रीटोला-नवरगाव मार्गावरील पूलवजा बंधारा वाहून गेल्याची घटना समोर आली आहे.

Aug 13, 2026
खोटे आरोप करून सत्ता मिळवणाऱ्या भाजपाने आता देशाची माफी मागावी!

खोटे आरोप करून सत्ता मिळवणाऱ्या भाजपाने आता देशाची माफी मागावी!

Congress Abhay Salunkhe: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे लातूर जिल्हाधिकारी अभय साळुंके यांनी भाजपांना खोटे आरोपांच्या बाबतीत देशाची माफी मागावी म्हणून मागणी केली आहे.

Aug 09, 2026