कोरची (Dainik Deshonnati Varadhapan) : दैनिक देशोन्नतीच्या वर्धापन दिन पंधरवड्यानिमित्त दररोज प्रकाशित होत असलेल्या विशेषांकाचा प्रकाशन सोहळा शुक्रवार (७ ऑगस्ट) रोजी कोरची तालुक्यातील पर्यटन स्थळ ढासगड (मोहांडी परिसर) येथे उत्साहात पार पडला. ग्रामीण भागातील कष्टकरी वर्गाच्या उपस्थितीत हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला असून कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद लाभला.
या वेळी मुख्यप्रचारक ईश्वरदासजी दखने, कार्यवाह गणेशरामजी मारगाये, पुजारी अंजोरीराम नैताम ,किशोर तिखट,कुसुम ईटवले तसेच पाथरगोटा येथील ग्रामपंचायत सदस्य, आणि शेतकरी-शेतमजुरांच्या हस्ते विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाला धमंदीप घुटके (ग्रामपंचायत सदस्य), जगनजी मेश्राम, पांडुरंग दिघोरे, श्रीहरी मेश्राम, विनोद कामथे, सूर्यवंशी मेश्राम, विलास खरकाटे, चंद्रशेखर बगमारे, निखिल अलोने, सौ. प्रभाबाई कामथे, प्रतिभा दिघोरे, पुष्पाबाई बगमारे, सिताबाई मेश्राम, सुनंदा खरकाटे, वैशाली नान्ने, अर्चना मिसार, शशिकला प्रधान, यशवदा नान्ने, मानसिंग नान्ने, शारदाबाई वाघरे, राधिका नान्ने, कृष्णाबाई नान्ने, आदित्य वाघरे, दक्ष नखाते यांच्यासह मोठ्या संख्येने महिला-पुरुष शेतकरी व शेतमजूर उपस्थित होते. यावेळी दैनिक देशोन्नतीचे प्रतिनिधी राष्ट्रपाल नखातेही उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर (Dainik Deshonnati Varadhapan) उपस्थितांसाठी पर्यटन स्थळ ढासगड येथे गोड जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी उपस्थितांनी देशोन्नतीने ग्रामीण भागातील प्रश्न, शेतकरी हिताचे विषय आणि समाजहिताच्या मुद्द्यांना सातत्याने न्याय दिल्याबद्दल कौतुक व्यक्त केले. वर्धापन दिन विशेषांकाचे स्वागत करत दैनिकाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा
दैनिक देशोन्नती (Dainik Deshonnati Varadhapan) हे शेतकरी व शेतमजुरांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे वृत्तपत्र असून शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे आहे. शेतकरी नेते तथा मुख्य संपादक प्रकाशभाऊ पोहरे यांच्या आक्रमक लिखाणामुळे आणि विविध आंदोलनांमुळे शेतकऱ्यांच्या अनेक समस्या शासन दरबारी पोहोचत असल्याची भावना यावेळी उपस्थित शेतकरी-शेतमजुरांनी व्यक्त केली.