दांडगे पेट्रोल पंपाजवळ भीषण अपघात; एक ठार, एक जखमी

बुलढाणा रोडवरील दांडगे पेट्रोल पंपाजवळ मोटारसायकल व वॅगनार कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला.

दांडगे पेट्रोल पंपाजवळ भीषण अपघात; एक ठार, एक जखमी

Dandge Petrol Pump

चिखली (Dandge Petrol Pump) : शहरालगतच्या बुलढाणा रोडवरील दांडगे पेट्रोल पंपाजवळ सोमवारी (१ जून) रात्री सुमारे ७.३० वाजेच्या सुमारास मोटारसायकल व वॅगनार कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुलसुंदर व गोलू गवारे हे दोघे रायडर स्पोर्ट मोटारसायकल (क्र. एमएच-२८ बीएक्स-२७८६) वरून बुलढाण्याकडून चिखलीकडे येत होते. दरम्यान, दांडगे पेट्रोल पंपाजवळ त्यांची मोटारसायकल वॅगनार कार (क्र. एमएच-४९ बीबी-६३४६) वर आदळली. धडक इतकी जबरदस्त होती की वॅगनार कारचे काही भाग तुटून विखुरले.

​​​​​​​

या भीषण अपघातात अक्षय कुलसुंदर याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर गोलू गवारे हा जखमी झाला असून त्याच्यावर जे जे प्लस हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत. मृत व जखमी दोघेही चिखली शहरातील राऊतवाडी परिसरातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुढील तपास व कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या दुर्घटनेमुळे चिखली शहरात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
चिखलीतील कुख्यात गुंड ईश्वर धनवटे वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

चिखलीतील कुख्यात गुंड ईश्वर धनवटे वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

Chikhli gangster Ishwar Dhanwate: शहर व परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चिखली पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध धडक कारवाई सुरू ठेवली आहे. अंतर्गत विविध गंभीर गुन्ह्या

Oct 06, 2026
वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

मानोऱ्यात वैद्यकीय विद्यार्थ्याला बोलेरो पिकअपची धडक; तक्रार आणि CCTV पुरावा असूनही वाहन ताब्यात न घेतल्याचा आरोप.

Oct 03, 2026
सेवा संकल्प अभियानातून स्वच्छ चिखलीचा संदेश; माजी सैनिकांचा सन्मान

सेवा संकल्प अभियानातून स्वच्छ चिखलीचा संदेश; माजी सैनिकांचा सन्मान

Chikhli Seva Sankalp Mission: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच त्यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवापर्वानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान

Oct 02, 2026
मुख्यमंत्री सहायता निधीत एक लाखांची मदत; वाढदिवसानिमित्त मुख्याधिकाऱ्यांची सामाजिक बांधिलकी

मुख्यमंत्री सहायता निधीत एक लाखांची मदत; वाढदिवसानिमित्त मुख्याधिकाऱ्यांची सामाजिक बांधिलकी

Chief Officer Prashant Bidkar: चिखली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत बिडकर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहायता निधीत १ लाख रुपयांची मदत जमा केली.

Oct 01, 2026