सोनम वांगचुंग समर्थन

२० जुलैला मानोऱ्यात सोनम वांगचुंग यांच्या समर्थनार्थ शांततापूर्ण रॅलीचे आयोजन! 

Sonam Wangchung Support: दिल्लीच्या जंतर मंतर येथून सुरू होणाऱ्या सोनम वांगचुंग यांच्याकडे समरथन रैलीसाठी विद्यार्थी एकताकडून मानोरा पोलिस स्टेशनला परवानगी मागितली गेली.

२० जुलैला मानोऱ्यात सोनम वांगचुंग यांच्या समर्थनार्थ शांततापूर्ण रॅलीचे आयोजन! 

Sonam Wangchung Support

विद्यार्थी एकताकडून पोलीस प्रशासनाकडे परवानगीसाठी निवेदन सादर!

मानोरा (Sonam Wangchung Support) : दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुंग यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी 'विद्यार्थी एकता' या संघटनेच्या वतीने दि. २० जुलै २०२६ रोजी सोमवारला मानोरा येथे शांततापूर्ण समर्थन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीसाठी परवानगी व ध्वनीक्षेपक वापरण्याबाबत संघटनेने मानोरा पोलीस स्टेशनच्या ठाणेदार नैना पोहेकर यांचेकडे दि. १७ जुलै रोजी निवेदन सादर केले आहे.  

निवेदनानुसार सोमवार दिनांक २० जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता रॅली पंचायत समिती पासून ते तहसिल पर्यंत निघणार आहे. सदर रॅली दरम्यान जनजागृतीसाठी घोषणा व सूचना देण्याच्या उद्देशाने ध्वनीक्षेपक अर्थात साऊंड सिस्टीम वापरण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक ती परवानगी द्यावी अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.     ध्वनीक्षेपकाचा वापर शासनाच्या नियमांचे व पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे पूर्णपणे पालन करून करण्यात येईल. सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची पूर्ण काळजी घेतली जाईल.  निवेदनावर विजय पाटील, प्रकाश राठोड, सुनील राठोड,  गोपाल चव्हाण, श्याम पवार, गजानन सोनटक्के, मस्तोविन शेख, प्रफुल इंगोले, सुशांत खडसे, अक्षय अंधारे, आवेश समितीया, किसन वायले, चेतन पवार, नितीन चगदल, महेश राठोड आदी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.  
 
दिल्लीतील आंदोलनाला स्थानिक पातळीवर पाठिंबा दर्शवण्यासाठी होत असलेल्या या रॅलीकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.  

संबंधित सामग्री

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक पुन्हा निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढणार.

Oct 07, 2026
‘लोकांचं मनोरंजन करता करता मीच ड्रामा झालो’; कोर्टात राजपाल यादव भावुक; १.१५ कोटी जमा, उर्वरित ८५ लाखांसाठी मुदत

‘लोकांचं मनोरंजन करता करता मीच ड्रामा झालो’; कोर्टात राजपाल यादव भावुक; १.१५ कोटी जमा, उर्वरित ८५ लाखांसाठी मुदत

चेक बाऊन्स प्रकरणात राजपाल यादवांनी सुप्रीम कोर्टात १.१५ कोटींचा डिमांड ड्राफ्ट दिला. उर्वरित ८५ लाखांसाठी कोर्टाने दोन आठवड्यांची मुदत दिली.

Oct 07, 2026
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण झाली. जनतेच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी देशसेवा आणि ‘राष्ट्र प्रथम’चा दृष्टिकोन मांडला.

Oct 07, 2026
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश केल्याच्या आरोपावरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह विरोधी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केला.

Oct 07, 2026